Money Heist actress Esther Acebo
Money Heist actress Esther Acebo

Money Heist : अभिनेत्रीच्या घरातील गणपतीचा फोटो व्हायरल

Published on

पुढारी ऑनलाईन

स्पॅनिश वेब सीरिज मनी हाएस्ट चर्चेत असणारी सीरीज आहे. या सीरीजमधील कलाकारांच्या भूमिकाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. या वेब सीरीजचे जगभर चाहते आहेत. पण, आता एक विशेष बाब म्हणजे या सीरीजमधील स्पॅनिश अभिनेत्रीच्या घरातील एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो हिंदू देवता गणपतीचा आहे.

या स्पॅनिश अभिनेत्रीचे नाव आहे- एस्थर अॅसेबो (Esther Acebo). तिचे काही फोटोज व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती उभी असलेली दिसते. तिच्या मागे मोठा गणपतीचा फोटो दिसत आहे. यामुळे ती चर्चेत आलीय.

हे फोटो तिच्या घरातील आहेत. तो फोटो तिनं सोशल मीडिया (Social Media) वर शेअर केलाय.

नेटफ्लिक्सवरील ही एक क्राईम ड्रामा वेब सीरीज आहे. यातील कलाकारांपैकी एक एस्थर अॅसेबो मुख्य अभिनेत्री आहे. मनी हाइस्ट मालिका गेल्या महिन्यात संपत असताना, इन्स्टाग्रामवर एका युजरनं एस्थरचा फोटो शेअर केला. आणि ती चर्चेत आली. यामध्ये श्रीगणेशाच्या पेंटिंगच्या समोर उभी असलेली दिसतेय.

दरम्यान, मनी हाइस्टचे आतापर्यंत पाच सीझन रिलीज झाले आहेत. यात एस्थर अॅसेबोने स्टॉकहोमची भूमिका साकारली आहे.

अनेक लोकांनी हा फोटो शेअर करून कॅप्शन लिहिलीय-भारतासाठी गर्वाचा क्षण. स्पेनच्या या प्रसिध्द अभिनेत्री एस्तेर एसेबो (Esther Acebo) चे फॅन फॉलोईंगही अधिक आहे. नेटफ्लिक्स (Netflix) फेमस सीरीज मनी हाएस्टमध्ये मोनिका उर्फ स्टॉकहोमची भूमिका तिने साकारलीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by EstherAcebo (@estheracebo)

 

View this post on Instagram

 

A post shared by EstherAcebo (@estheracebo)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news