Lakhbir Singh Landa | कोण आहे कॅनडातील गँगस्टर लखबीर सिंग लांडा? ज्याला केले दहशतवादी घोषित

Lakhbir Singh Landa | कोण आहे कॅनडातील गँगस्टर लखबीर सिंग लांडा? ज्याला केले दहशतवादी घोषित
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : कॅनडा स्थित गँगस्टर लखबीर सिंग लांडा याला गृह मंत्रालयाने दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. ३३ वर्षीय लखबीर सिंग लांडा हा प्रतिबंधित खलिस्तानी गट बब्बर खालसा इंटरनॅशनलचा (BKI) सदस्य आहे. त्याचा २०२१ मधील मोहाली येथील पंजाब पोलिस गुप्तचर मुख्यालयावरील रॉकेट हल्ल्याच्या कटात त्याचा सहभाग होता. डिसेंबर २०२२ मध्ये तरन तारनमधील सरहाली पोलिस स्थानकावर झालेल्या आरपीजी हल्ल्यासह इतर दहशतवादी कारवायांमध्येही त्याचा हात आहे. हा दहशतवादी मूळचा पंजाबचा आहे. पण तो गेल्या काही वर्षांपासून कॅनडात राहत आहे. भारताविरुद्ध कट रचण्यात त्यांचा सहभाग आहे. (Lakhbir Singh Landa)

संबंधित बातम्या 

यावर्षी सप्टेंबरमध्ये पंजाब पोलिसांनी त्याच्या जवळच्या साथीदारांशी संबंधित ४८ ठिकाणी छापे टाकले. २१ सप्टेंबर रोजी एका व्यापाऱ्यावर दोघांना हल्ला केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्या व्यापाऱ्याने सांगितले होते की, मला लांडा हरीके असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आला आणि त्याने १५ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर छापे टाकून काही जणांना अटक करण्यात आली होती.

कोण आहे लखबीर सिंग लांडा?

गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की, 'लखबीर सिंग उर्फ लांडा, जो सध्या एडमोंटन, अल्बर्टा, कॅनडा येथे राहतो. तो बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित आहे. लांडाचा रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडद्वारे झालेल्या हल्ल्यात सहभाग होता. दहशतवादी लखबीर सिंग लांडा याचा कॅनडा स्थित खलिस्तानी समर्थक संघटनेशी (पीकेई) जवळचा संबंध होता. ज्याच्याशी मृत खलिस्तान टायगर फोर्स (KTF) चा दहशतवादी हरदीप सिंग निज्जर आणि शीख फॉर जस्टिसचा दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नून देखील जोडला गेला होता. (Lakhbir Singh Landa)

पंजाबमध्ये दहशतवादी कारवायांसाठी सीमेपलीकडून इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव डिवाइस (आयईडी), शस्त्रे, अत्याधुनिक शस्त्रे, स्फोटके अशा विविध मॉड्यूल्सच्या पुरवठ्यात त्याचा सहभाग होता. लांडाचा दहशतवादी मॉड्यूल, खंडणी, खून, आयईडी, शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांची तस्करी आणि पंजाब आणि देशाच्या इतर भागांमध्ये दहशतवादी कारवांयासाठी पैशाचा वापर यासारख्या विविध गुन्हेगारी प्रकरणांमध्ये तो आरोपी आहे. याशिवाय दहशतवादी लांडाचा भारताच्या विविध भागात टार्गेट किलिंग, खंडणी व इतर देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news