

पुढारी ऑनलाईन डेस्क: काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा ( Milind Devar ) यांनी आज (दि. १४) शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. अनेक वर्षांपासून गांधी कुटुंबीयांशी एकनिष्ठ राहिलेले मुरली देवरा यांचे पुत्र, काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील माजी खासदार तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी आज सकाळी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला हाेता. ( Former Congress leader Milind Deora joins Shiv Sena )
देवरा यांनी पक्षीय सीमोल्लंघन करावे, यासाठी एका वजनदार उद्यागपतीने त्यांची मनधरणी केली होती. आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर देवरा यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात हाेत आहे. ( Former Congress leader Milind Deora joins Shiv Sena )
आजचा दिवस माझ्यासाठी खूप भावनिक आहे. मी काँग्रेस पक्ष सोडेन असे कधीच वाटलं नव्हतं. आज मी माझ्या कुटुंबाचे काँग्रेसबरोबर असलेले ५५ वर्षांचे नाते संपुष्टात आणत आहे. माझं राजकारण नेहमीच विकासाला चालना देणारे राहिले आहे. सर्वसामान्य लोकांची सेवा हेच माझे राजकारणाचे मुख्य कारण आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठीचा एक मोठा दृष्टीकोन आहे. मला त्यांचे हात बळकट करायचे आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शिवसेनेच्या माध्यमातून साथ देयची आहे, असेही यावेळी मिलिंद देवरा यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो, असेही ते म्हणाले.
पक्षाच्या अत्यंत खडतर आणि कठीण काळात आम्ही काँग्रेस पक्षाला साथ दिली. आताच्या आणि आधीच्या काँग्रेसमध्ये खूपच फरक आहे. काँग्रेस पक्षाने जर मेहनत आणि योग्यतेला महत्त्व दिले असते तर माझ्या जीवनात हा दिवस आला नसता. मी आणि एकनाथ शिंदे एकत्र आलो नसतो. एकनाथ शिंदे यांनाही काही महिन्यांपूर्वीच असाच निर्णय घ्यावा लागला, असेही त्यांनी सांगितले.
मिलिंद देवरा यांनी आपल्या भावना व्यक्त केला. दीड वर्षापूर्वी अशाच भावनांमधून गेलो आहे. मी डॉक्टर नसतानाही ऑपरेशन केले. कोठेही धक्का लागला नाही. कठाेर निर्णय घेताना धाडस करावे लागते. मी मिलिंद देवरा यांचे शिवसेनेत स्वागत करतो, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ( Former Congress leader Milind Deora joins Shiv Sena )
हेही वाचा :