Microsoft : मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी यशस्वी होण्यासाठी युवकांना दिला ‘मोलाचा सल्ला’ म्हणाले…

satya nadella
satya nadella
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Microsoft : "तुमची सध्याची नोकरी तुमच्या करिअरची उद्दिष्टे गाठण्यात अडथळा आहे असे समजण्याऐवजी, तुम्ही याला तुमची उत्सुकता, समर्पण आणि शिकण्याची उत्सुकता दाखवण्याची संधी मानली पाहिजे. ही मानसिकता अंगीकारून, तुम्ही तुमच्या पदोन्नतीला किंवा पगाराच्या वाढीचा वेग कोणत्याही दीर्घकालीन योजनेपेक्षा अधिक वेगाने वाढवू शकता," असा सल्ला मायक्रोसॉफ्टचे Microsoft सीईओ सत्या नाडेला यांनी दिला आहे.

लिंक्डइनचे सीईओ रायन रोस्लान्स्की यांच्या मुलाखतीत झालेल्या संभाषणादरम्यान मायक्रोसॉफ्टचे Microsoft सीईओ सत्या नाडेला यांनी स्पष्टपणे त्यांचे विचार मांडले. तसेच यावेळी त्यांनी त्यांच्या मायक्रोसॉफ्टमधील 30 वर्षांच्या कार्यकाळात आलेले महत्वाचे अनुभव मांडले. तसेच त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यातील त्यांचे विचार मांडले.

Microsoft नाडेला यांनी सांगितले की, त्यांनी कधीही जगातील सर्वात शक्तिशाली तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एकाचे नेतृत्व करूया अशी अपेक्षा केली नव्हती. ते म्हणाले जेव्हा ते 1992 मध्ये एक तरुण अभियंता म्हणून कंपनीत रुजू झाले तेव्हा त्यांच्या दीर्घकालीन कारकीर्दीच्या योजनेत सीईओ होण्याचा त्यांचा कोणताही विचारही नव्हता.

ते म्हणाले, मला स्पष्टपणे आठवते की मायक्रोसॉफ्टमध्ये मी जेव्हा पहिल्यांदा आलो होतो. तेव्हा मी हा विचार करत होतो की माझ्याकडे पृथ्वीवरील सर्वात मोठे काम आहे आणि मला आणखी कशाचीही गरज नाही. ते म्हणाले मी त्यावेळच्या माझ्या भूमिकेत उत्कृष्ट कार्य करण्यावर लक्ष केंद्रित केले. मायक्रोसॉफ्टमध्ये Microsoft दशकांच्या कामा दरम्यान त्यांनी शिकलेली महत्वाची गोष्ट नव्याने आपल्या करिअरची सुरुवात करणा-या तरुणांसाठी सांगितले.

नाडेला म्हणाले की तुमच्या सध्याच्या कामात तुम्ही तुमचे सर्वोत्तम द्या, पुढील नोकरीची वाट पाहू नका. मायक्रोसॉफ्टच्या 30 वर्षाच्या काळात मी कधीही हा विचार केला नाही की मी आताचे काम हे दुस-या मोठ्या नोकरी मिळावी यासाठी करत आहे. तर मायक्रोसॉफ्टच्या माझ्या नोकरीला मी सर्वात जास्त महत्व दिले कारण मला मनापासून ते वाटले. सत्या नाडेला यांनी हे स्पष्ट केले की तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्ही जे आता करत आहात त्यात तुमची प्रगती होत नाही तर तुमची ग्रोथ कधीच होणार नाही.

सत्या नाडेला यांची मायक्रोसॉफ्टमधील Microsoft कारकीर्द

1992 मध्ये मायक्रोसॉफ्ट से जुडे, मायक्रोसॉफ्टमध्ये समाविष्ट झाले होते. त्यापूर्वी नाडेला यांनी सन मायक्रोसिस्टम्समध्ये आपल्या टेक्नॉलॉजीचे सदस्य म्हणून 1990 मध्ये काम केले. मायक्रोसॉफ्टमध्ये सत्या लवकर एक लीडर म्हणून ओळखले जाऊ लागले. जे मायक्रोसॉफ्टची सर्वात मोठी उत्पादने बदलण्यासाठी तंत्रज्ञानाचा विस्तार आणि व्यवसाय विस्तार करू शकतात.

मायक्रोसॉफ्टमध्ये, नाडेला यांनी प्रमुख प्रकल्पाचे नेतृत्व केले आहे, कंपनीचे क्लाउड कंप्यूटिंग आणि विकास जगातील सर्वात मोठ्या क्लॉड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एक समाविष्ट आहे. प्रथम, ऑनलाइन सेवा विभागासाठी संशोधन आणि विकास विभागामध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम केले आणि त्यानंतर मायक्रोसॉफ्टचे 19 बिलियन $ चे सर्व्हर आणि टूल्स व्यवसायाचे अध्यक्ष बनले. जेव्हा त्यांनी कंपनीच्या व्यवसायात उत्कृष्ट बदल केला ज्याने मायक्रोसॉफ्टला उत्कृष्ट उत्पन्न आणि लाभ दिला. मायक्रोसॉफ्टने क्लाउड आणि एंटरप्राइझ ग्रुपचे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. नंतर 2014 मध्ये ते मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बनले.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news