Mehangai Par Halla Bol
Latest
Mehangai Par Halla Bol: रामलीला मैदानावर आज ‘महागाईवर हल्ला बोल’ रॅली
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली येथील रामलीला मैदानावर आज (रविवार, दि.४) केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसतर्फे 'महागाईवर हल्ला बोल' (Mehangai Par Halla Bol) रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारला बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तुवरील जीएसटी याबाबत घेराव घालणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाचे अनेक नेते रॅलीला संबोधित करणार आहेत.
सध्याच्या घडीला काँग्रेस पक्षाचा भारत जोडो यात्रा' सर्वात मोठा जनसंपर्क कार्यक्रम आहे. आजच्या 'महागाई वर हल्ला बोल' रॅलीमध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी वैद्यकीय उपचारासाठी देशाबाहेर गेल्याने त्या उपस्थित राहणार नाहीत. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधीही त्यांच्यासोबत गेल्या असल्याने त्याही या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्लीत रामलीला मैदान आणि परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठिकठिकाणी पोलिस तैनात असून सुरक्षेसाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहे.
हेही वाचलंत का?

