ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करावी, दोन टप्प्यातील एफआरपीचा कायदा रद्द करुन एक रकमेचा कायदा पुर्ववत करावा, नियमित कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांचे प्रलंबित प्रोत्साहन अनुदान तातडीने बँक खात्यावर जमा करावे, ऊस वाहतूकदारांच्या फसवणूक केलेल्या ऊस तोडणी मुकादमांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करुन संबंधित मुकादमांच्याकडून थकीत वसूली होण्याबाबत, पीक विमा, अतिवृष्टी, गारपीटीची रक्कम तातडीने जमा करण्याबाबत आणि द्राक्ष उत्पादक प्रचंड आर्थिक संकटात असून कांदा उत्पादकांच्या धर्तीवर बेदाणा उत्पादकांना अनुदान देणे या प्रमुख 6 मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केल्या आहेत.