

मराठी टेलिव्हिजन जगतातील गोंडस अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे (Hruta Durgule). ऋताने तिच्या हटके अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या तिची सोशल मीडियात खुपच चर्चा सुरू आहे. याचं कारण म्हणजे तिने आपल्या प्रेमाबाबत केलेला खुलासा. हृताने तिचं प्रेम कुणावर आहे हे जाहीर केल्यानंतर सर्वांनाच सुखद धक्का बसला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारे तिने ही माहिती जग जाहीर केली आहे.
ऋताने तिच्या इन्स्टाग्राम अकौंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. तर कॅप्शनमध्ये तीने मस्त असा रोमँटीक संदेशही लिहिला आहे. ऋता म्हणते, 'I find in YOU the hope I've never known ♥️✨??'. फोटोत ऋता पिवळ्या रंगाच्या खास अशा वन पीसमध्ये दिसत असून तिच्या सोबत टीव्ही दिग्दर्शक प्रतीक शहा आहे. आणि हाच प्रतीक ऋताच्या दिलाचा राजा आहे.. आणि ती प्रतीकच्या दिलाची राणी.. प्रतीक काळ्या रंगाच्या पठाणी वेशभुषेत दिसत असून दोघे एकमेकांच्या डोळ्यात प्रेमाने पाहत आहेत. हृताच्या चेह-यावर प्रेमात बुडाल्यानंतरच आनंदी हास्य आहे. तर प्रतीकचा चेहरा 'आखे में तेरा ही चेहरा' असा अविर्भाव आहे.
ऋताने पोस्ट टाकताच चाहत्यांनी लाईक, कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तर इंडस्ट्रीतील ऋताचे सहकारी आणि मित्रही तिच्यावर कौतुकाचा वर्षावर करताना दिसत आहेत. कमेंट मध्ये 'रंग माझा वेगळा' मालिकेचा अभिनेता आशुतोष गोखले यांने हृताचे अभिनंदन केले असून 'अर्रे अर्रे अर्रर्री क्या बोलती पब्लिक' अशी कमेट केली आहे. तर तर दिग्दर्शक रवी जाधव, अभिनेत्री गौरी नलावडे, अन्विता फलटणकर, प्रिया बापट या मराठी सेलिब्रेटींनी हृताला आपापल्या स्टाईलने शुभेच्छा दिल्या आहेत.