Champions League 2023 : मॅनचेस्टर सिटीची स्वप्नपूर्ती!; पहिल्यांदाच पटकावले चॅम्पियन्स लीगचे जेतेपद

Champions League 2023 : मॅनचेस्टर सिटीची स्वप्नपूर्ती!; पहिल्यांदाच पटकावले चॅम्पियन्स लीगचे जेतेपद
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : चॅम्पियन्स लीग स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (दि.१०) रात्री मॅनचेस्टर सिटी आणि इंटर मिलान यांच्यात झाला. या सामन्यात मॅनचेस्टर सिटीने इस्तंबूल येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात इंटर मिलानचा १-० गोल फरकाने पराभव करत प्रथमच चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावले. (Champions League 2023) या विजेतेपदासह सिटीने सलग तीन लीग जिंकण्याची कामगिरी केली आहे.

चॅम्पियन्स लीगपूर्वी, सिटीने हंगामात मँचेस्टर युनायटेडचा पराभव करून इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल), आणि एफए कप ट्रॉफी जिंकली आहे. अशी तिहेरी पूर्ण करणारा मँचेस्टर सिटी हा दुसरा इंग्लिश क्लब ठरला आहे. १९९८-९९ मध्ये एकाच मोसमात तीन विजेतेपदे जिंकणारा मँचेस्टर युनायटेड हा पहिला इंग्लिश क्लब आहे. (Champions League 2023)

इंटर मिलानविरुद्धच्या अंतिम सामन्यात मँचेस्टर सिटीसाठी रॉड्रिने ६८व्या मिनिटाला गोल केला. या एकमेव गोलमुळे सिटीने मिलानचा पराभव केला. सामन्याच्या पूर्वार्धात प्रमुख मिडफिल्डर केविन डी ब्रुयनला दुखापत होऊनही सिटीने सामना जिंकला. यासह संघाने युरोपियन फुटबॉलच्या शिखरावर पोहोचण्याची आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण केली. मँचेस्टर सिटीने प्रथमच युरोपियन फुटबॉलमधील मानाची स्पर्धा जिंकली आहे. प्रशिक्षक पेप गार्डिओला यांनी तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

मँचेस्टर सिटीने इंग्लिश फुटबॉलमध्ये अनेक विजेतेपदे जिंकली आहेत. परंतु, त्यांना चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवता पटकावता आले नव्हते. यंदाच्या हंगामात मँचेस्टर सिटीने नेत्रदीपक कामगिरी करत जेतेपदावर कब्जा केला. याआधी २०२१ च्या अंतिम फेरीत पराभूत झाल्याने संघ विजेतेपदापासून वंचित राहिला होता. चेल्सीने २०२१ साली झालेल्या लीगच्या अंतिम फेरीत सिटीचा पराभव केला होता. जगातील सर्वोत्तम फुटबॉल क्लब चॅम्पियन्स लीगमध्ये खेळतात.

इंटरच्या आशांवर फिरले पाणी

गेल्या १३ वर्षांपासून चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावण्याचे इंटर मिलानचे स्वप्न यावेळीही भंगले. मिलानने २०१० साली बायर्न म्युनिकचा पराभव करून चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर या संघाला चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावता आलेले नाही. यंदाचा हंगाम इंटर मिलानसाठी उत्कृष्ट ठरला. यंदा त्यांनी दोन विजेतेपद पटकावले आहेत. त्यांनी कोपा इटालिया आणि सुपरकोपा इटालियाना विजेतेपद पटकावले आहेत. तर संघ सेरी-ए मध्ये तिसरे स्थान पटकावले. इंटर मिलानने ही चॅम्पियन्स ट्रॉफी तीनदा जिंकली आहे. इंटर मिलानने १९६४ साली चॅम्पियन्स लीगचे पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते. यानंतर १९६५ आणि २०१० मध्येही ही ट्रॉफी जिंकली होती.

सामन्यातील योगायोग

मँचेस्टर सिटी आणि इंटर मिलानचे संघ एका सामन्यात आमने-सामने येण्याची ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी असा प्रसंग २००५ साली आला होता. यानंतर दोन्ही संघ अंतिम सामन्यात प्रथमच आमने-सामने आले होते. योगायोगाने तो सामनाही इस्तंबूलमध्ये झाला होता. त्यावेळीही इंग्लंड आणि इटलीचे दोन क्वब आमने-सामने आले होते. त्यावेळी इंग्लंडच्या लिव्हरपूल क्लबने इटलीच्या एसी मिलानचा पराभव केला होता. यावेळीही इंग्लंडचा क्लब मँचेस्टर सिटीने इटलीच्या इंटर मिलानचा पराभव केला.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news