Maherchi Sari : ‘माहेरची साडी’नंतर तब्बल ३० वर्षांनी ‘लेक असावी तर अशी’…
पुढारी ऑनलाईन डेस्क : 'माहेरची साडी' हा मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेला चित्रपट. त्याने आपल्या नावावर अनेक विक्रम नोंदवले. त्याचे दिग्दर्शक होते विजय कोंडके. आता तब्बल ३० वर्षांनंतर विजय कोंडके पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या नव्या चित्रपटाच्या शुटिंगचा आज (दि. १५) शुभारंभ झाला.
विजय कोंडकेंचा नवा चित्रपट 'लेक असावी तर अशी
ज्योती पिक्चर्स निर्मित 'लेक असावी तर अशी' असे विजय कोंडके यांच्या या नव्या आगामी चित्रपटाचे नाव असणार आहे. विजय कोंडके यांच्या भोर तालुक्यातील इंगवली येथील कोंडके फार्मवर या चित्रीकरणास सुरुवात झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या हस्ते या चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
अवधूत गुप्ते, वैशाली सामंत या प्रमुख गायकांसह इतरही नवीन गायकांनी या चित्रपटामध्ये गाणी गायली आहेत. विजय कोंडके आणि मंगेश कांगणे यांनी गीते लिहिली आहेत. या चित्रपटात यतीन कार्येकर, शुभांगी गोखले, प्राजक्ता हणमघर व गायत्री दातार यांच्यासह ओंकार भोजने, सविता मालपेकर, सुरेखी कुड़ची, सोमेश सावंत, अभिजित चव्हाण, नयना आपटे यांच्या भूमिका आहेत.
हेही वाचा
- साडीचा ड्रेस शिवून घातलास काय?; दीपिकाचा डिपनेकमध्ये धुरळा
- Srinidhi Shetty : मेहबूबा मैं तेरी मेहबूबा, केजीएफ गर्ल'ने जागवल्या आठवणी
- पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा 'गेट टुगेदर' चित्रपटाचा टीजर लाँच
- साडीचा ड्रेस शिवून घातलास काय?; दीपिकाचा डिपनेकमध्ये धुरळा
- 'तुझ्या प्रेमात वेडा झालो मी हुमा; एकदा ऐकशील का माझं?'

