

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; चाळीसगावचे भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर त्यांच्या कार्यालयात जाऊन पाच जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नाशिक येथे गेल्या दोन दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र दरम्यान आज (दि. 10) पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान चाळीसगावात त्यांच्या मृत्यूची वार्ता पसरल्याने तणाव वाढला असून चाळीसगाव खबर पोस्ट ताज पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त परिसरात लावला आहे. (Mahendra More Death)
चाळीसगाव येथील भाजपाचे नगरसेवक महेंद्र उर्फ बाळा मोरे यांच्यावर (दि. 7) सायंकाळी पाच वाजता पाच जणांनी त्यांच्या सिंधी कॉलनीतील कार्यालयात येऊन गोळीबार केला होता व ते पाचही जण कारमधून पसार झाले होते. त्यानंतर जखमी महेंद्र मोरे यांना ग्रामीण रुग्णालयात नंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथे खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, (दि. 10) रोजी पहाटे साडेतीन वाजेला त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूची वार्ता चाळीसगाव मध्ये पसरतात पोलीस प्रशासनाने एसआरपी व इतर बंदोबस्त जागोजागी लावण्यात आला आहे. (Mahendra More Death)
माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाल्यामुळे सात जनांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात 302 चे कलम वाढणार आहे. गोळीबार प्रकरणी अजय संजय बैसाणे (वय ३१ वर्षे, रा. लक्ष्मी नगर, बसस्टॅन्डच्या पाठीमागे, चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरून उददेश उर्फ गुडडू शिंदे (रा. हिरापुर), सचिन गायकवाड (रा. चाळीसगाव), अनिस शेख उर्फ नव्वा शरीफ शेख (रा.हुडको कॉलनी, चाळीसगाव), सॅम चव्हाण (रा. हिरापुर), भुपेश सोनवणे (रा. चाळीसगाव), सुमित भोसले (रा. चाळीसगाव), संतोष निकुंभ उर्फ संता पहेलवान (रा. हिरापुर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तर सुमित भोसले आणि संतोष निकुंभ हे देखील या कटात सहभागी होते, असेही फिर्यादीत नमूद होते. मोरेंच्या मृत्यूची वार्ता चाळीसगावात पसरल्याने तणावात भर पडली आहे. Mahendra More Death
गोळीबार केल्यानंतर मारेकरी ज्या वाहनातून पसार झाले होते, ते वाहन पोलिसांच्या हाती लागले आहे. यातील आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांचे पाचही पथक रवाना झालेले असून गेल्या दोन दिवसापासून पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही.
हेही वाचा :