

Who is Devavrat Mahesh Rekhe: काशीच्या पवित्र मातीत गेल्या दोन महिन्यांपासून एक ऐतिहासिक आध्यात्मिक साधना सुरू होती. शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिनी शाखेतील सुमारे 2000 मंत्रांचे अत्यंत कठीण ‘दंडक्रम पारायण’ 19 वर्षांच्या वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे याने पूर्ण केले आहे. जवळपास 200 वर्षांनंतर दंडक्रम पारायण पुन्हा भारतात पार पडले असून या यशामुळे तरुण देवव्रत देशभरात चर्चेत आला आहे.
पारायण पूर्ण होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवव्रतचे अभिनंदन करत म्हटले “देवव्रत रेखेंनी केलेली ही साधना पुढील पिढ्या लक्षात ठेवतील. 2000 मंत्रांचा दंडक्रम इतक्या अचूकतेने 50 दिवसांत संपवणे हा असाधारण पराक्रम आहे.” काशीमध्ये हा अनोखा उपक्रम झाला याचा विशेष उल्लेख पीएम मोदींनी केला आहे.
मूळ गाव : अहिल्यानगर
वडील : वेदब्रह्मश्री महेश चंद्रकांत रेखे
वैदिक शिक्षण : सांगवेद विद्यालय, वाराणसी
रोजची साधना : 4 तास दंडक्रमाचा अभ्यास
मित्र आणि गुरूजनांच्या मते देवव्रतची स्मरणशक्ती, एकाग्रता आणि शिस्त विलक्षण आहे.
दंडक्रम हा वैदिक पाठाचा सर्वात अवघड प्रकार मानला जातो.
पारायणाची वैशिष्ट्ये —
मंत्र उलट–सुलट दोन्ही प्रकारे म्हणावे लागतात
स्वर, लय, उच्चार यांची अत्यंत बारकाईने जुळवाजुळव करावी लागते
पूर्ण पारायणात एक कोटीपेक्षा जास्त शब्दांचा उच्चार करावा लागतो
यासाठी स्मरणशक्ती, शारीरिक-मानसिक नियंत्रण आवश्यक आहे
विद्वानांच्या मते, वेदपठणाच्या एकूण 8 पद्धतींपैकी हा सर्वात कठीण प्रकार आहे.
पहिल्यांदा — 200 वर्षांपूर्वी नाशिकमध्ये, वेदमूर्ती नारायण शास्त्री देव यांनी
दुसऱ्यांदा — आता काशीमध्ये, देवव्रत रेखे यांनी (2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025)
त्यांना ₹1,01,116 देऊन सन्मानित करण्यात आले.
दीर्घ साधना आवश्यक
मंत्र पाठात एकही चुक चालत नाही
उलट-सरळ पाठांतर
श्वसन, स्वर आणि स्मरणशक्तीचा ताळमेळ
रोजच्या साधनेत शिस्त
यामुळेच दंडक्रमाला वैदिक परंपरेचा ‘मुकुटमणी’ असेही संबोधले जाते.