Yavatmal News : अंत्यविधीवेळी स्मशानभूमीत मधमाशांचा हल्ला! नागरिकांची पळापळ; अनेक जण जखमी

गोंधळामुळे अंत्यविधी काही काळासाठी खोळंबला
Honey  Bee Attack News
Honey Bee Attack Pudhari file Photo
Published on
Updated on

यवतमाळ : अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत जमलेल्या नागरिकांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना सोमवारी आर्णी तालुक्यातील अंजनखेड येथे घडली. या अनपेक्षित हल्ल्यामुळे स्मशानभूमीत उपस्थित नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली आणि काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या हल्ल्यात गणेश आत्राम, विनोद कुंडकर, कृष्ण रोडगे, दत्ता बनसोड, शिवदास तिरपुडे, देवानंद साखरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ जखमी झाले आहेत.

Honey  Bee Attack News
Yavatmal News | यवतमाळ : पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला आठ वर्षाचा कारावास

मिळालेल्या माहितीनुसार, अंजनखेड येथील शिक्षक गणेश भागवत यांच्या आईचे रविवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचे ठरले होते. यासाठी नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.

अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना, विधीसाठी लागणारा विस्तव पेटवण्यात आला. या विस्तवाच्या धुरामुळे स्मशानभूमी परिसरातील कडुलिंबाच्या झाडावर असलेली मधमाशांची तीन पोळी अचानक विचलित झाली आणि मधमाशांनी उपस्थित नागरिकांवर हल्ला चढवला.

Honey  Bee Attack News
Yavatmal District Bank Election : यवतमाळ जिल्हा बँक निवडणुकच्या रणधुमाळीस सुरुवात!

हा हल्ला इतका भीषण होता की, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नागरिकांना तिरडी जमिनीवरच ठेवून सैरावैरा पळावे लागले. या गोंधळामुळे अंत्यविधी काही काळासाठी खोळंबला होता. प्राथमिक उपचारानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news