Yavatmal District Bank Election : यवतमाळ जिल्हा बँक निवडणुकच्या रणधुमाळीस सुरुवात!

पहिल्याच दिवशी ,उमरखेड गटातून माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर तर महागाव गटातून नितीन भुतडा यांचा अर्ज दाखल!
Yavatmal District Bank Election : यवतमाळ जिल्हा बँक निवडणुकच्या रणधुमाळीस सुरुवात!
Published on
Updated on

उमरखेड : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक रणधुमाळीला सोमवार दिनांक 7 पासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी उमरखेड तालुका सोसायटी गटातून माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर व महागाव गटातून भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सहकार क्षेत्रात प्रकाश पाटील देवसरकर 28 वर्षापासून सलग बँकेचे संचालक आहेत तर नितीन भुतडा यांचे हे पहिलेच पाऊल आहे त्यावेळी उमरखेड तालुका सोसायटी गटातील 52 मतदारांपैकी जवळपास 28 मतदार उपस्थीत असल्याचा दावा देवसरकर समर्थकांनी केला. महागाव तालुक्यातील सोसायटी गटातील बहुतांश मतदार भुतडा यांचे सोबत होती.

यावेळी, आमदार किसनराव वानखेडे, माजी आमदार नामदेव ससाने, विजय खडसे, माजी जि प अध्यक्ष, रमेश चव्हाण, बाजार समितीचे सभापती कृष्णा पाटील देवसरकर, बळवंतराव नाईक , खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सुदर्शन रावते ,महागाव तालुक्यातील गुलाबराव जाधव, अजय पुरोहित, साहेबराव कदम भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दतराव काळे,माजी नगराध्यक्ष बालाजी उदावंत गजानन देवसरकर यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते. सोबत दोन फोटो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news