

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : केलेल्या कामाचे देयक काढण्यासाठी एकूण रकमेच्या ५० टक्के रक्कम मागण्यात आली. यामुळे त्रस्त झालेल्या कंत्राटदाराने थेट एसीबीकडे धाव घेतली. अमरावती एसीबी पथकाने दोन वेळा पडताळणी केली. तिसऱ्यांदा गुरुवारी यवतमाळ नगरपरिषद बांधकाम विभागात १ लाख ८० हजारांची लाच घेताना नगर अभियंत्यासह चौघांना अटक केली. Yavatmal bribe case
प्रभारी नगर अभियंता निखिल पुराणिक, उद्यान पर्यवेक्षक शताक्षी उभाळकर, लिपिक शेख साजीद शेख वजीर, पुराणिक यांचा खासगी हस्तक सतीश जीवने असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ठरल्याप्रमाणे अमरावती एसीबीचे पथक यवतमाळात गुरुवारी दुपारी दाखल झाले. फोन कॉलवरील संभाषणाचे रेकॉर्ड आणि तडजोडीअंती आरोपींनी 'नगरपरिषद बांधकाम विभागातच १ लाख ८० हजारांची लाच स्वीकारली. नगर अभियंता पुराणिक याच्यासाठी सतीश जीवने याने १ लाख ६० हजार घेतले. तर 'पर्यवेक्षक व लिपिक यांनी स्वतः प्रत्येकी १० हजार रुपये स्वीकारले. एसीबीने सापळा लावलेला असताना पंचासमक्ष ही रक्कम आरोपींनी घेतली. तत्काळ सर्वांनाच एसीबी पथकाने ताब्यात घेतले. Yavatmal bribe case
ही कारवाई पोलीस निरीक्षक केतन मांजरे, चित्रा मेहेत्रे, अनिल वानखेडे, कर्मचारी वैभव जायले, आशिष जांभुळकर, चालक उपनिरीक्षक सतीश किटकुले यांनी केली. या प्रकरणी आरोपींविरोधात यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार रात्री उशीरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा