यवतमाळ हादरले! नराधम शिक्षकाचे दुष्कृत्य; १७ वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

Yavatmal sexual abuse : अज्ञानाचा फायदा घेत शिक्षकाने ठेवले शारीरिक संबंध; गर्भवती विद्यार्थींनीचा उपचारादरम्यान मृत्यू
Yavatmal sexual abuse
नराधम शिक्षकाचे दुष्कृत्य; १७ वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू Pudhari File Photo
Published on
Updated on

यवतमाळ : मागील अनेक दिवसांपासून खाजगी शिकवणी वर्ग घेणाऱ्या एका नराधम शिक्षकाने शिकवणीला येणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थीनीसोबत शारीरीक संबंध ठेवले. तिला गर्भवती केल्याने तिचा रविवार (दि.२१) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी नराधम शिक्षकाला पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखले करून अटक केली. उमरखेड तालुक्यातील ढाणकी शहरात ही घटना उघडकीस आली. दरम्यान समाजाला काळीमा फासणाऱ्या घटनेचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

Yavatmal sexual abuse
Bhoom Flood | भूम तालुक्यात पावसाचा कहर; पुराच्या लोंढ्याचा वस्तीला तडाखा, झोपेतच महिलेचा मृत्यू

संदेश गुंडेकर (वय २७ रा. ढाणकी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या खाजगी शिकवणी वर्गात पिडीत विद्यार्थिनी ही मागील वर्षभरापासून जात होती. अशातच आरोपी नराधम शिक्षकाने तिच्या अज्ञानाचा फायदा घेत फुस लावून १ डिसेंबर २०२४ ते दि. १९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत अनेकदा तिच्यासोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केले आणि पीडितेस गर्भवती होण्यास कारणीभूत ठरला. पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून पीडितेला उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आरोपीला भोकर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास ठाणेदार पांडुरंग शिंदे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सागर अन्नमावर, रावसाहेब मस्के हे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Yavatmal sexual abuse
Thane workplace accident : 7 व्या मजल्यावरून पडून मॅनेजरचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news