

ठाणे : ठाण्यात कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हायलँड पार्क या 32 माळ्याच्या इमारतीच्या 7 व्या माळ्यावरून सिद्धी ग्रुप इंटरप्राईजेस या कंपनीच्या स्टोअर मॅनेजर सचिन वसंत गुंडेकर (49) याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 2-35 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हायलँड हॉस्पिटल मागे, हायलँड पार्क, ढोकाळी, ठाणे (प.) या ठिकाणी हायलँड पार्क मधील बिल्डिंग नंबर 2 मधील पी 1, पी 2 अधिक तळ अधिक 32 मजली इमारतिचे या बांधकाम सुरू होते. याच इमारतीच्या सातव्या मजल्यावरून सचिन वसंत गुंडेकर (49) रा. श्रीकृपा सोसायटी नंबर 1, सर्वोदया नगर, गव्हाणी पाडा, नाहूर रोड मुलुंड.याचा पडून तळ मजल्यावरती असलेल्या लोखंडी परांची व दोरखंडमध्ये अडकले आढळले. गुंडेकर हे सिद्धी ग्रुप इंटरप्राईजेस या कंपनीचे स्टोअर मॅनेजर म्हणून काम करीत असल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
घटनास्थळी बाळकुम अग्निशमन केंद्राचे स्थानक अधिकारी, कापूरबावडी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान रुग्णवाहिका उपस्थित होते. इमारतीवरून पडलेल्या गुंडेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
सदर व्यक्तीला अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचार्यांनी बाहेर काढून कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुंडेकर यांचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी सिव्हिल रुग्णालय, ठाणे येथे पाठविण्यात आल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.