यवतमाळ येथे भररस्त्यात बेल पुडा विक्रेत्याचा खून

Yavatmal News | परिसरात दशहतीचे वातावरण निर्माण
street murder incident in Yavatmal
यवतमाळ येथे भररस्त्यात बेल पुडा विक्रेत्याचा खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. File Photo
Published on
Updated on

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : बेल पुडा विक्रेत्याचा वर्दळीच्या रस्त्यावर चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना रविवारी (दि.१८) रात्री शहरातील लोहारा परिसरातील देवीनगर येथे घडली. श्रावण सोमवार असल्याने सायकलवरून बेल पुडा विक्री करत देवीनगर येथील घरी परत येत असताना एकाने चाकूने छातीत वार करून हत्या केली. ही घटना अनेकांच्या समक्ष घडल्याने परिसरात दशहतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Yavatmal News)

रामनाथ सोनटक्के (वय ५०) असे मृताचे नाव आहे. तो कोळंबी फाटा येथून रोजगाराच्या शोधा लोहरा येथे राहत होता. त्याने देवीनगर भागातच किरायाने खोली घेतली होती. श्रावण महिन्यात बेलपुडा विक्री करून कुटुंबाचे भरण पोषण करत होता. रविवारी दिवसभर परिसरात बेलपुडा विक्री करून घराकडे परत जात असताना एकाने त्याच्यावर चाकून वार केले. चाकूचा घाव थेट छातीवर बसल्याने रामनाथ जागेवरच कोसळला. परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस येईपर्यंत रामनाथ रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. (Yavatmal News)

street murder incident in Yavatmal
यवतमाळ : जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news