Yavatmal Accident : हिवरा संगम येथे ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात

आरोग्य सेवकाचा मृत्यू, महामार्ग विभागाच्या कारभारावर संताप
Truck bike accident
हिवरा संगम येथे ट्रक-दुचाकीचा भीषण अपघातpudhari photo
Published on
Updated on

महागाव :हिवरा (संगम) येथील श्री एकविरा देवी मंदिर परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात करण कुमार पुंजाजी भागवत (वय 30, रा. बेलथर, ता. कळमनुरी) या आरोग्य सेवकाचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना सायंकाळी 4:30 वाजता घडली.

नांदेडहून नागपूरकडे जाणारा ट्रक (एमएच 09 इएल 4392) आणि समोरून येणारी दुचाकी (एमएच 38 वाय एच 3748) यांची जोरदार धडक झाली. मयत करण कुमार हे हिंगणघाट येथे आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होते. कर्तव्य बजावून गावी परतत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. घटनेचा पंचनामा महागाव पोलिसांनी केला असून पुढील तपास ठाणेदार धनराज निळे करत आहेत.

Truck bike accident
Hingoli Crime : ट्रॅक्टर नावावर करा अन्‌‍ 10 लाख द्या,तगाद्याला कंटाळून तरुणाचा गळफास

हिवरा संगम येथील हा भाग अपघातप्रवण क्षेत्र बनला आहे. येथे दिशादर्शक फलक, गतीमर्यादा सूचना आणि गतिरोधकांचा पूर्णपणे अभाव आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे अनेक निष्पाप बळी जात आहेत. जोपर्यंत येथे सुरक्षा उपाययोजना होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

Truck bike accident
Naigaon ration scam : नायगावात‌‘मुडदे‌’ही खातात रेशन!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news