

सेनगाव : ट्रॅक्टर नावावर करून देणे आणि 10 लाख रुपयांच्या मागणीसाठी नातेवाईकांनी लावलेल्या तगाद्याला कंटाळून एका 33 वर्षीय तरुणाने शेतात गळफास घेत जीवन संपवले. ही खळबळजनक घटना हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली. सुखदेव राठोड असे मयत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंगरगाव येथील सुखदेव राठोड (वय 33) आणि संशयित आरोपी संजय सकरू जाधव हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात मागील काही दिवसांपासून किरकोळ कारणावरून वाद सुरू होते. या वादाचे पर्यावसान हाणामारीतही झाले होते. मात्र, दोघेही एकाच पाहुण्यांमधील असल्याने गावातील नातेवाईकांनी मध्यस्थी करत बैठक घेऊन हा वाद मिटवला होता.
सहा जणांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी मयताचे नातेवाईक संतोष राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून सेनगाव ठाण्यात संजय जाधव, अनिल जाधव, सुनील जाधव, गणेश जाधव आणि अन्य दोघांविरुद्ध (सर्व रा. डोंगरगाव/परिसर) आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.