Yavatmal Crime | यवतमाळ : साकूरमध्ये अघोरी कृत्याचा कट उधळला; घरात खड्डा, पूजेचे साहित्य आणि ५ आरोपी अटकेत!

यवतमाळ पोलिसांची धडक कारवाई: जादूटोण्याच्या तयारीत असलेले टोळके रंगेहाथ पकडले
Yavatmal Crime
प्रातिनिधीक छायाचित्रfile photo
Published on
Updated on

यवतमाळ :तालुक्यातील साकूर येथे काही व्यक्ती मिळून अघोरी कृत्य करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, त्यांचा प्रयत्न यवतमाळ प्रामीण पोलिसांनी हाणून पाडला. शनिवारी ता.१९ रात्रीच्या सुमारास घवतमाळ ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला, तेव्हा घरातील एका खोलीत मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला होता. खड्याच्या बाजूलाच निंबू, नारळ, ओटीचे सामान आढळून आले. घटनास्थळावरून पाच आरोपीला पकडण्यात आले. एक आरोपी पसार झाला आहे.

यवतमाळ ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, यवतमाळ तालुक्यातील साकूर, गावातील आकाश उकंडराव कोटनाके याच्या घरात काही बाहेरगावातील व्यक्ती संशयित हालचाली करीत होते. या माहितीच्या आधारावर शनिवारी रात्री यवतमाळ

Yavatmal Crime
Yavatmal Crime News : यवतमाळमध्‍ये गुप्तधनासाठी अघोरी कृत्य, आईसह अल्पवयीन मुलीला घरात डाबून दिले चटके

ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील नाईक यांच्यासह पथकाने साकूर येथील आरोपीच्या घरी छापा मारला, घराच्या आतमधील खोलीत एक मोठा मातीचा खड्डा खोदून असल्याचे निदर्शनास पडले, तर बाजूलाच निंबू, नारळ, ओटीचे साहित्य आढळून आले. यावेळी चार आरोपींना पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले. परंतु एका आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करीत त्यालासुद्धा ताब्यात घेतले. यामध्ये आकाश उफंडकराव कोटनाके (वय ३०, रा. साकूरहेटी, यवतमाळ), सोनू उर्फ कुणाल सुरेश खेकरे (वय ३८, रा. सारखणी, किनवट, नदिड), वृषभ मनोहर तोडसकर (वय २४, रा. तिवसाळा, घाटंजी), प्रदीप रामकृष्ण इळपाते (वय ५०, मेह, वाशिम), बबलू उर्फ निश्चय विश्वेश्वर येरेकर (वय २६, देऊरवाडी, आर्णी), असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहे.

Yavatmal Crime
Yavatmal Crime : जुन्या वादातून विधिसंघर्षग्रस्त बालकाने केला युवकाचा खून

तर एक आरोपी फरार आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी अघोरी कृत्याचे साहित्य आणि तीन मोटारसायकल ताब्यात घेतल्या. ताब्यात घेतलेल्या आरोपीविरोधात यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानूष, अनिष्ट व अघोरी प्रतिबंध आणि समूळ उच्चाटन करण्याच्या अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील नाईक, प्रवीण मानकर, संजय राठोड, रमेश कोदरे, रणजित जाधव, गजानन खांदवे, सचिन पातकमवार, पंकज नेहारे, तुशाल जाधव, रूपेश नेव्हारे यांनी पार पाडली. पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news