Banking Security Umarkhed: जिथे बँकांचे जाळे, तिथेच सीसीटीव्हीचे वावडे

Umarkhed city news: शहरात कोट्यवधींची सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित; मात्र बँक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Banking Security Umarkhed
Banking Security Umarkhed
Published on
Updated on

उमरखेड : शहरातील प्रमुख बँका, एटीएम आणि सीएससी सेंटरची मोठी संख्या पुसद रोड परिसरात आहे. दिवसभर नागरिकांची वर्दळ आणि कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांची उलाढाल सुरू असणार्‍या या संवेदनशील परिसरावर मात्र शासकीय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पुरेशी नजर नसल्याचे चित्र आहे. शहरासाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले सुरक्षाकवच बँकांच्या परिसरातच अपुरे ठरत असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

Banking Security Umarkhed
Umarkhed News | राखीव जागेवर 'नमो उद्यान' कशाला?; मुंबई उच्च न्यायालयाने शासनाकडून मागवले उत्तर

पुसद रोडवर सेंट्रल बँक, स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पुसद अर्बन, जिजाऊ बँक, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक अशा अनेक बँकांच्या शाखा आहेत. याशिवाय विविध एटीएम आणि सीएससी सेंटरही याच परिसरात आहेत. त्यामुळे या भागात सातत्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होतात.

Banking Security Umarkhed
Umarkhed news : बाजारभावापेक्षा कमी दराचे आमिष; सिमेंट, पोलाद व साखरेत ३.६८ कोटींची फसवणूक

मध्यंतरी एटीएम व बँकांशी संबंधित चोरी आणि फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. एटीएम फसवणूक प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही. अशा पार्श्वभूमीवर बँक व एटीएम परिसरात प्रभावी सीसीटीव्ही यंत्रणा असणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक ठरते.

Banking Security Umarkhed
Umarkhed Development Plan | उमरखेडच्या विकास आराखड्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी

दरम्यान, जिल्हा नियोजन निधीतून कोट्यवधी रुपये खर्च करून शहरातील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे शहराच्या सुरक्षाव्यवस्थेला मोठी मदत झाली आहे. मात्र, केवळ बँकांची अक्षरशः ‘जत्रा’ भरलेल्या पुसद रोड परिसरातच शासकीय कॅमेऱ्यांची पुरेशी नजर नसल्याने या सुरक्षायंत्रणेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Banking Security Umarkhed
Yavatmal Fire | गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत ४ गायी मृत्युमुखी; २ जनावरे जखमी

पोलिस तपासातही अडचण

चोरी, फसवणूक यांसारख्या घटना घडल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज हा तपासातील महत्त्वाचा पुरावा ठरतो. मात्र, पुसद रोड परिसरात शासकीय सीसीटीव्ही यंत्रणा अपुरी असल्याने पोलिसांना बँका, एटीएम आणि खासगी प्रतिष्ठानांवरील कॅमेऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. काही ठिकाणी कॅमेऱ्यांची दिशा, व्हिजिबिलिटी तसेच फुटेज उपलब्धतेच्या मर्यादा असल्याने तपासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरात कोट्यवधी रुपये खर्चून सीसीटीव्ही प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. मग आर्थिक व्यवहारांचे प्रमुख केंद्र असलेल्या बँक परिसरातच सीसीटीव्हीची कमतरता का? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. पुसद रोड परिसरातील बँका, एटीएम आणि सीएससी सेंटरच्या सुरक्षेसाठी तातडीने सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याची मागणी होत आहे.

Banking Security Umarkhed
Nanded Municipal News | उमरखेडच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तीन नगरपंचायतींचा अतिरिक्त भार

तात्काळ प्रस्ताव टाकू : नितीन भुतडा

“उमरखेड शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाल्याने शहराच्या सुरक्षेत निश्चितच वाढ झाली आहे. मात्र, बँक परिसरात सीसीटीव्हीची व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या भागात सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तातडीने प्रस्ताव मांडून मंजुरी घेण्यासाठी प्रयत्न करू,” अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news