

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : दिग्रस तालुक्यातील डेहणी येथे विद्युत वाहिन्यांना स्पर्श झाल्याने काका आणि पुतण्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. विठ्ठल ब्रह्मा राठोड (वय २५) व नागोराव हरिचंद्र राठोड (वय २३, दोघेही रा. डेहणी) अशी त्यांची नावे आहेत.
दोघेही शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास पिकांची पाहणी व वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी त्यांचा वीज वाहिन्यांना स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसला. रात्री उशिरापर्यंत घरी आले नसल्याने त्यांची शोधाशोध केली असता घटना उघडकीस आली.
हेही वाचा :