यासाठी शासनाने २२ कोटी ८० लाख ४ हजार रुपये नुकसान मदत निधी दिला आहे. तसेच मार्च व एप्रिल २०२३ मध्ये गारपिट व अवकाळी पावसामुळे यवतमाळ, कळंब, घाटंजी, राळेगाव, दारव्हा, नेर, आर्णी, बाभुळगाव, पुसद, दिग्रस, उमरखेड, महागाव, पांढरकवडा या १३ तालुक्यात नुकसान झाले होते. यात भाजीपाला, उन्हाळी ज्वारी, तीळ या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. एकुण १२५३० शेतक-यांचे ५६९७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. यासाठी नुकसानासाठी शासनाने मदत म्हणुन ९ कोटी ७४ लाख १० हजार रुपये निधी मंजुर केला आहे.