…तर संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदीची मागणी का करीत नाही ?

…तर संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदीची मागणी का करीत नाही ?

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्हयात भाजप युती शासनाच्या काळात दारूबंदी झाली मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात दारूबंदी उठविण्यात आली. त्यामुळे दारूबंदी व्हावी अशी मागणी भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केल्यानंतर माजी पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी फक्त चंद्रपूर जिल्ह्याचाच का विचार करता संपुर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करीत नाही, अशी टिका करून पलटवार केला आहे. दोन्ही नेत्यांच्या वार पलटवारामुळे चंद्रपूरात पुन्हा दारूबंदीचा मुद्दा चर्चेत आला आहे.

दारूची सर्वात जास्त झळ ही स्त्रियांना बसते, तिचे अख्ये आयुष्य मातीमोल होते. दारू प्राशन करणे वाईट असून दारूबंदी होणे सर्वांच्या हिताचे आहे. भाजप युतीशासनाच्या काळात सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली. मात्र काँग्रेसच्या सत्ताकाळात ती पुन्हा सुरू झाली. दारूबंदी हवी अशी चंद्रपूर येथील महिलांची भूमिका असेल, तरी पुन्हा दारूबदी झालीच पाहिजे अशी मागणी नुकतेच चंद्रपूरच्या दौऱ्यावर येऊन गेलेल्या चित्रा वाघ यांनी केली होती. तसेच राज्यशासनापर्यंत प्रभावी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा दारूबंदी व्हावी या चित्रा वाघ यांच्या मागणीवर चंद्रपूर जिल्‍हाचे माजी पालकमंत्री विजय वड्डेटवार यांनी चांगलाच पलटवार केला आहे. ते म्हणाले, चित्रा वाघ यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची मागणी केली. त्या अवघ्या राज्याच्या नेत्या आहेत. मग केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच दारूबंदीची मागणी का करीत आहेत. त्या संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदीची मागणी का करीत नाहीत? असा सवाल त्‍यांनी आहे. त्यांना येथून विधान परिषदेची उमदेवारी पाहिजे आहे का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दारूबंदी करायचीच असेल, तर ती संपूर्ण राज्यात करा, असे आव्हानही वडेट्टीवार यांनी यावेळी दिले.

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा दारूबंदीची चर्चा दोन्ही नेत्यांच्या वार पलटवारांनी सुरू झाली आहे. विजय वड्डेटीवारांनी संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदीची मागणी करून चित्रा वाघ खरचं आव्हान दिले का. चंद्रपूरात पुन्हा चित्रा वाघ यांच्या प्रयत्नातून दारूबंदीसाठी प्रयत्न होणार का हे आता येणारी वेळच ठरविणार आहे. मात्र दोन्ही नेत्यांच्या दारूबंदीच्या मुद्यावरून राजकारणाला सुरूवात झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. शेवटी वड्डेटीवारांनी, शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आतापर्यंत जेवढे उद्योग या महाराष्ट्रातून बाहेर गेलेत, त्यातून जवळपास 5 लाख रोजगार आपल्या मुलांना मिळाला असता सरकारने लक्ष दिले नाही असा आरोपीही त्यांनी केला आहे.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news