वाशिम : महिला अधिकाऱ्याला ३० हजाराची लाच घेताना अटक

वाशिम : महिला अधिकाऱ्याला ३० हजाराची लाच घेताना अटक

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : वाशीम येथील भूमिअभिलेख कार्यालयात वर्ग ३ च्या उपअधीक्षक पदावर असलेल्या महिला अधिकारी यांना ३० हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली. वाशीम लाचलुचपत विभागाने सापळा रचून महिला अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले. मायादेवी रघुनाथ तलवारे वय 42 वर्ष, रा. वाशीम असे लाच घेणाऱ्या महिला अधिका-याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शेत शिवार कार्ली जि. वाशिम मध्ये तक्रारदार व त्याच्या भावाचे नावे असलेल्या शेतीला लागून असलेले जमीन चुकीच्या पद्धतीने मोजणी झाली आहे. तक्रारदार व त्यांच्या भावाच्या शेतीची चुकीची मोजणी दुरुस्त करून देण्याकरिता भूमिअभिलेख कार्यालयातील महिला अधिकारी यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली.

दरम्‍यान, त्‍यांना 30 हजार रूपये लाच देण्यात आली. यावेळी वाशीम लाचलुचपत विभागाने त्‍यांना रंगेहाथ पकडले. त्‍यानंतर वाशिम पोलिस ठाण्यात त्‍यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news