Pallavi Bodile : सलग २४ तास शिकविण्याचा पल्लवी बोदीले यांचा विक्रम; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद

Pallavi Bodile : सलग २४ तास शिकविण्याचा पल्लवी बोदीले यांचा विक्रम; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद
Published on
Updated on

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : सलग २४ तास जीवशास्त्र अध्यापनाचा विक्रम विज्ञान शिक्षिका पल्लवी पाटोदकर बोदिले (Pallavi Bodile) यांनी केला. याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये करण्यात आली आहे. दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ आणि सेल ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंगी येथील विद्यापीठ सभागृहात हा आगळावेगळा विक्रम नोंदविला गेला.

गत दहा वर्षांपासून पल्लवी सुरज बोदिले  (Pallavi Bodile) या जीवशास्त्र हा विषय शिकवत असून या विक्रमाकरिता त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डससाठी पूर्वनोंदणी केली होती. त्यानुसार, गुरुवारी पहाटे ५.४० वाजता त्यांनी दत्ता मेघे सभागृहात जीवशास्त्र या विषयाचे विविध धडे पूरक आकृत्यांच्या मांडणीसह शिकविणे सुरू केले. या कालावधीत त्यांनी आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जीवशास्त्र तसेच शरीरविज्ञान शास्त्राच्या तासिका घेतल्या. सायंका‍‍ळची सत्रात त्यांचे वयात येणाऱ्या मुलामुलींबाबत पालकांकरीता स्वतंत्र व्याख्यानही झाले. प्रत्येक दोन व्याख्यानांच्या दरम्यान १० मिनिटांची विश्रांती घेण्याची अधिकृत सवलत असताना त्याचाही फारसा वापर न करता पल्लवी बोदिले यांनी पूर्वघोषित १८ तासांचा विक्रम रात्री पूर्ण केला.

विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण प्रतिसाद मिळत असल्याने आपला उत्साह कायम ठेवत पल्लवी बोदिले यांनी विज्ञान विषयांची मांडणी दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत सुरूच ठेवली. या २४ तासांच्या सलग व्याख्यानात आवाजाचा स्तर आणि देहबोलीवर नियंत्रण ठेवत तसेच कोठेही न अडखळता व चुकीचा शब्दोच्चार येणार नाही, याची पूर्ण दक्षता घेत हे आव्हान त्यांनी यशस्वीरीत्या पेलले. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता या बायोलॉजी लेक्चर मॅराथॉनच्या विक्रमाची रीतसर घोषणा आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे नियुक्त परीक्षक डॉ. मनोज तत्ववादी यांनी केली. पल्लवी बोदिले यांना या विक्रमाचे प्रमाणपत्र पदक व सन्मानचिन्हासह प्रदान करण्यात आले.

या आयोजनात सेल अकॅडमीचे संचालक सुरज बोदिले, दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठातील अलाईड हेल्थ सायन्सेसचे संचालक डॉ. अभ्युदय मेघे, संजय इंगळे तिगावकर, डॉ. सुधाकर शिंदे, बेन्नी सॅम्युअल, रितुराज चुडीवाले, स्वप्नील चरभे, अभिजित वानखेडे, अफसर पठाण, पुरुषोत्तम वाघमारे, कार्तिक व गौरव पाटोदकर यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमातील विविध सत्रात कुंबलकर समाजकार्य महाविद्यालय, सेल अकॅडमी तसेच विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news