Washim Court Verdict | वाशिम जि.प. पाणीपुरवठा विभागातील दोन लाचखोरांना ५ वर्षे सक्तमजुरी

Washim Zilla Parishad | जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
Court Verdict
Court Verdict Pudhari
Published on
Updated on

Washim Bribery Case

वाशिम: जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागातील तत्कालीन सहायक लेखा अधिकारी आणि कनिष्ठ सहायक यांना २० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी (दि. ४ ) दोषी ठरवत ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच दोन्ही आरोपींना प्रत्येकी ५० हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.

सुभाष मोतीराम इंगळे (सहायक लेखा अधिकारी, वर्ग-३) आणि निलेश मधुकर लंगोटे (कनिष्ठ सहायक, वर्ग-३) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

Court Verdict
Washim News | राज्य कराटे स्पर्धेत वाशिमच्या आलियाचे सुवर्ण यश

२००८ मध्ये भारत निर्माण योजनेअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या निधीचा तिसरा हप्ता मिळवून देण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी १७ हजार रुपये सुरुवातीला स्वीकारल्यानंतर, उर्वरित ३ हजार रुपये ३० मे २००८ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रचलेल्या जाळ्यात आरोपींनी स्वीकारले. याप्रकरणी वाशिम पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयाचा निकाल

विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय, वाशिम यांनी आज दोन्ही आरोपींना कलम ७ अन्वये ४ वर्षे शिक्षा व २५ हजार रुपये दंड, तसेच कलम १३ अन्वये ५ वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड अशी एकूण ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीराम नारायण काळू यांनी बाजू मांडली.

Court Verdict
Washim News | जैनांची काशी शिरपूर जैन येथे चतुर्मुख मंदिराचा वार्षिकोत्सव उत्साहात

ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news