Washim News | जैनांची काशी शिरपूर जैन येथे चतुर्मुख मंदिराचा वार्षिकोत्सव उत्साहात

आचार्यश्री विमलहंस सुरिश्वरजी महाराज, मुनीराज राजहंस विजयजी महाराज, मुनीराज रत्नवल्लभ विजयजी महाराज यांची विशेष उपस्थिती
Shirpur Jain temple annual festival
Shirpur Jain temple annual festivalPudhari
Published on
Updated on

Shirpur Jain temple annual festival

वाशिम : जैनांची काशी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या शिरपूर जैन येथील श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ महातीर्थ परिसरातील नूतन चतुर्मुख जैन मंदिराचा तृतीय वार्षिकोत्सव भाविकांच्या उपस्थितीत व धार्मिक उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी ध्वजारोहणाचा मान लाभलेल्या लाभार्थी कुटुंबीयांच्या हस्ते, मंत्रोच्चार व विधीपूर्वक मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास आचार्यश्री विमलहंस सुरिश्वरजी महाराज यांच्यासह अनेक साधू-मुनीराज व साध्वीवृंद उपस्थित होते. या प्रसंगी शेकडोच्या संख्येने श्वेतांबर जैन समाजबांधव सहभागी झाले होते.

Shirpur Jain temple annual festival
Washim News | स्त्री भ्रुणहत्या रोखण्यासाठी वाशिम प्रशासनाचा मोठा निर्णय; माहिती देणाऱ्यास १ लाखाचे बक्षीस

जैनांची काशी म्हणून ओळख असलेल्या श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थान, शिरपूर जैन येथील कांतीलाल लल्लुभाई झवेरी संकुलातील पारसबाग परिसरात हे भव्य व आकर्षक चतुर्मुख जैन मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात श्री ऋषभदेव भगवान, श्री संभवनाथ भगवान, श्री विमलनाथ भगवान व श्री महावीर स्वामी या तीर्थंकरांच्या मूर्तींची सन २०२३ मध्ये विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली होती.

सुरत येथील विधीकारांच्या हस्ते सतरभेदी पूजा व अभिषेक पूजन संपन्न झाल्यानंतर मंदिर शिखरावर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आचार्यश्री विमलहंस सुरिश्वरजी महाराज, मुनीराज राजहंस विजयजी महाराज, मुनीराज रत्नवल्लभ विजयजी महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली.

Shirpur Jain temple annual festival
Washim News | महाराष्ट्रतील पहिला मोफत प्रकल्प; वाशिम शहराला स्वच्छ शहर म्हणून मिळणार नवी ओळख

कार्यक्रमास श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानचे मॅनेजिंग ट्रस्टी दिलीप शाह, उपाध्यक्ष डॉ. संतोष संचेती तसेच विश्वस्त अभय शाह, मुकेश कोरडिया, पारसमल गोलेच्छा, किशोर सोनी, प्रकाशचंद सोनी, वैभव शाह, मनीष संचेती, हसमुख शाह यांच्यासह इतर विश्वस्त मंडळी उपस्थित होती.

मुंबई, नागपूर, अकोला, सुरत, बारडोली, अहमदाबाद, वाशिम, मालेगाव, लोणार, जालना, हिंगोली, परभणी व संभाजीनगर आदी विविध ठिकाणांहून शेकडो श्वेतांबर जैन समाजबांधवांनी या वार्षिकोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news