Washim Youth Death Electric Shock | लग्नमंडपातील विद्युत खांबाचा धक्का लागून युवकाचा मृत्यू

Washim Youth Death Electric Shock | संदीप अशोक इंगळे यांच्या आकस्मिक निधनाने कोळी गावावर शोककळा
 Youth Death
Youth Death
Published on: 
Updated on: 

वाशीम : लग्नाच्या मंडपातील लोखंडी खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने विजेचा तीव्र धक्का बसून युवकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. कारंजा तालुक्यातील कोळी गावातील संदीप अशोक इंगळे (वय २८ वर्षे, रा. कोळी) या युवकाचा या घटनेत मृत्यू झाला.

 Youth Death
Washim Crime News: वाशिम हादरले! चारित्र्याच्या संशयातून झोपलेल्या पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घातला

या घटनेमुळे कोळी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. अवघ्या २८व्या वर्षी संदीप यांचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निष्काळजीपणा की विद्युत सुरक्षेचा अभाव? या घटनेच्या पार्श्वभूमीवर लग्नसमारंभातील मंडप उभारणी आणि विद्युत जोडणीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 Youth Death
Washim Drought News: वाशिम जिल्ह्यातील ८५ लघु प्रकल्पांत केवळ २९.९१ टक्के पाणीसाठा; ११ प्रकल्प कोरडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.