Washim Crime News: वाशिम हादरले! चारित्र्याच्या संशयातून झोपलेल्या पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घातला

मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे कौटुंबिक वादातून घडलेल्या पत्नीच्या निर्घृण हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Washim Crime News
Washim Crime NewsFile Photo
Published on: 
Updated on: 

Washim Crime News

वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे कौटुंबिक वादातून घडलेल्या पत्नीच्या निर्घृण हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना आज (दि. १) सकाळी उघडकीस आली. सकाळी मुलगी आईच्या खोलीत गेल्यानंतर हा भयंकर प्रकार समोर आला.

दिनेश जोंधळे (वय ४५) असे आरोपी पतीचे नाव असून, शारदा दिनेश जोंधळे (वय ४२) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश हा व्यसनाधीन असून, तो आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेत होता. या कारणावरून पती-पत्नीत वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे.

Washim Crime News
Crime News: करवा चौथला मोठ्या भावाने आपल्या पत्नीला 'जोडवी' भेट दिल्याचा संशय; पतीने खलबत्त्याने चेचून केली हत्या

शनिवार, रात्री दोघेही नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी खोलीत गेले होते. मात्र, पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास दिनेशने झोपेत असलेल्या पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात पत्नी शारदा हिचा मृत्यू झाला.

सकाळी मुलगी आईच्या खोलीत गेली असता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आईचा मृतदेह पाहून तिला मोठा धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच जऊळका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पती दिनेश याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

चारित्र्याच्या संशयातून एका महिलेचा जीव गेल्याने जऊळका परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे कौटुंबिक हिंसाचाराचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Washim Crime News
Crime news: विरारमध्ये धक्कादायक घटना! बंद फ्लॅटमध्ये आढळले तीन बहीण-भावांचे मृतदेह; पोलिसांना सापडला मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.