Teacher Suspended washim : दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी न केल्याने शिक्षक निलंबित; वाशिम जिल्हा परिषदेची मोठी कारवाई

ही वर्तणूक प्रशासनाची दिशाभूल करणारी आणि शासकीय आदेशांची अवमानना करणारी असल्याचे समोर आले
Suspension
SuspensionFile Photo
Published on
Updated on

अजय ढवळे

वाशिम : शासकीय नियमांनुसार आपल्या दिव्यांग प्रमाणपत्राची कायदेशीर पडताळणी न करणे आणि प्रशासकीय आदेशांकडे दुर्लक्ष करणे वाशिम जिल्ह्यातील एका प्राथमिक शिक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी माधव उत्तमराव जाधव (सहशिक्षक, जि. प. प्राथमिक शाळा नागठाणा, ता. जि. वाशिम) यांना शासकीय सेवेतून तात्काळ निलंबित केले आहे. या धडक कारवाईमुळे जिल्हा परिषद शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Suspension
Washim News | वाशिममध्ये शुक्रवारी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद; उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, माधव उत्तमराव जाधव हे नागठाणा येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राबाबत प्राप्त तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, शासनाने सर्व दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश जारी केले होते. या धोरणानुसार वाशिम जिल्हा परिषद कार्यालयाकडून संबंधित शिक्षकाला आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांची पडताळणी करून घेण्याबाबत वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

Suspension
Washim RTE news: आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील खासगी शाळांचे शासनाकडे शुल्क प्रतिपूर्ती तब्बल २० कोटी रुपये थकीत...

परंतु, वारंवार नोटिसा देऊनही शिक्षक श्री. माधव जाधव यांनी आपल्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी केली नाही, तसेच या संदर्भात कोणताही खुलासा किंवा माहिती वरिष्ठ कार्यालयाला सादर केली नाही. ही वर्तणूक प्रशासनाची दिशाभूल करणारी आणि शासकीय आदेशांची अवमानना करणारी असल्याचे समोर आले.

Suspension
Washim news: वाशिम शहराच्या सौंदर्यीकरणाला वेग; नगर परिषदेची विकासकामे प्रगतीपथावर...

या गंभीर बाबीची दखल घेत, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ३ नुसार माधव उत्तमराव जाधव यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय 'पंचायत समिती, रिसोड' येथे ठेवण्यात आले असून, पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आदेशावर शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर यांच्या डिजिटल स्वाक्षऱ्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news