Washim | एकीकडे अल्प पाऊस, दुसरीकडे पाण्याची नासाडी!

Washim Faces Low Rainfall and Water Wastage | एकीकडे अल्प पाऊस, दुसरीकडे पाण्याची नासाडी!
Washim Faces Low Rainfall and Water Wastage
Washim Faces Low Rainfall and Water Wastage
Published on: 
Updated on: 
Summary

जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘पाणी जपून वापरा’चे आवाहन

नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे हजारो लिटर पाणी वाया

जुनी नगर परिषद पाण्याची टाकी परिसरात पत्रकार भवनासमोर पाईप फुटली; प्रशासनाचे दुर्लक्ष

वाशीम : वाशीम जिल्ह्यात यंदा अल्प पाऊस झाल्याने पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची दाट शक्यता असताना, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नागरिकांना ‘पाणी जपून वापरा’ असे आवाहन केले आहे. मात्र, दुसरीकडे रोज हजारो लिटर पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहून वाया जात असल्याचे चित्र समोर आले आहे.

या पाण्यामुळं रस्यावर चिखल निर्माण होऊन नागरिक, वाहन चालक घसरून पडत आहेत. वाशीम नगर परिषदेने (पाणीपुरवठा विभाग) याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

जुन्या नगर परिषद पाण्याच्या टाकीजवळ, पत्रकार भवनासमोर पाण्याची पाईपलाईन फुटली असून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. संबंधित यंत्रणेचे याकडे अद्याप गांभीर्याने लक्ष गेले नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Washim Faces Low Rainfall and Water Wastage
Washim|सुरक्षित मार्गाचा वापर न करता चक्क रेल्वे पटरीवरूनच धोकादायक मार्गक्रमण; स्थानकावर प्रवाशांचा जीवघेणा प्रसंग!

एकीकडे, जिल्हाधिकारी पाणी बचतीचे आवाहन करीत आहेत, तर दुसरीकडे नगर परिषदेच्या जलवाहिनीतील गळतीमुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. फुटलेली पाईपलाईन तातडीने दुरुस्त करून पाण्याची नासाडी थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Washim Faces Low Rainfall and Water Wastage
Washim Cows Death : पिंपरी फॉरेस्ट परिसरात १५ गायी मृतावस्थेत आढळल्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news