Washim Cows Death : पिंपरी फॉरेस्ट परिसरात १५ गायी मृतावस्थेत आढळल्या

रामनगर रोडलगत फॉरेस्ट ऑफिसकडे जाणाऱ्या रस्त्यावर मृत जनावरांचा खच; परिसरात खळबळ
Washim Cows Death
Washim Cows Death : पिंपरी फॉरेस्ट परिसरात १५ गायी मृतावस्थेत आढळल्या
Published on: 
Updated on: 

वाशिम : कारंजा तालुक्यातील पिंपरी फॉरेस्ट परिसरात रामनगर रोडलगत फॉरेस्ट ऑफिसकडे जाणाऱ्या रस्त्यावर तब्बल १५ गायी मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने गायी मृतावस्थेत आढळल्याने त्यांच्या मृत्यूचे कारण काय, तसेच मृत जनावरे येथे आणून टाकण्यात आली आहेत का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या घटनेची माहिती शिवसेना महिला आघाडीच्या वाशिम जिल्हाप्रमुख प्रिया महाजन यांनी पोलिस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. फॉरेस्ट ऑफिस रोडलगत मृत गायी आढळल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांमध्येही संतापाचे वातावरण निर्माण झाले. या गायींचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाला आहे की अन्य काही कारणामुळे, हे स्पष्ट होण्यासाठी पशुवैद्यकीय तपासणी व शवविच्छेदन करणे आवश्यक आहे. तसेच मृत जनावरे अन्य ठिकाणाहून आणून येथे टाकण्यात आली असल्यास त्यामागील कारणांचाही तपास होणे गरजेचे आहे.

मृत गायींची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, घटनेची तातडीने चौकशी करावी आणि मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी प्रिया महाजन यांनी केली आहे. दरम्यान, घटनेची माहिती वन विभाग, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना देण्यात आली असून, प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी करून मृत गायींच्या मृत्यूचे कारण स्पष्ट केले जाते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news