Washim|सुरक्षित मार्गाचा वापर न करता चक्क रेल्वे पटरीवरूनच धोकादायक मार्गक्रमण; स्थानकावर प्रवाशांचा जीवघेणा प्रसंग!

Washim Passengers Risk Lives by Crossing Railway Tracks| सुरक्षित मार्गाचा वापर न करता चक्क रेल्वे पटरीवरूनच धोकादायक मार्गक्रमण; स्थानकावर प्रवाशांचा जीवघेणा मार्गक्रमण!
Washim
Washim Passengers Risk Lives by Crossing Railway TracksPudhari photo
Published on: 
Updated on: 

वाशिम : पूर्णा–अकोला रेल्वे वाशिम रेल्वे येथे दि. ५ अटोम्बर रोजी सकाळी ०९:४५ वाजता गाडी दुसऱ्या फलाट क्रमांकावर येण्याची येण्याची सूचना मिळताच अनेक प्रवाशांनी सुरक्षित मार्गाचा वापर न करता चक्क रेल्वे पटरीवरूनच धोकादायक मार्गक्रमण केले. विशेष म्हणजे, या जीवघेण्या प्रकारात वयोवृद्ध नागरिकांसह लहान मुलांचाही समावेश असल्याचे दिसून आले.

रेल्वे येण्याची घाई, फलाटावर जाण्यासाठी योग्य मार्गाची अडचण किंवा अन्य कारणांमुळे प्रवाशांनी थेट रेल्वे रुळ ओलांडण्याचा मार्ग स्वीकारला. मात्र, हा प्रकार कधीही मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देऊ शकतो. रेल्वे पटरीवरून चालणे किंवा रेल्वे रुळ ओलांडणे हे अत्यंत धोकादायक असून, अचानक रेल्वे आल्यास काही क्षणांत मोठी दुर्घटना घडू शकते.

‘घाईपेक्षा जीव महत्त्वाचा’ हे प्रवाशांनी लक्षात घेण्याची गरज आहे. रेल्वे प्रशासनानेही प्रवाशांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याबरोबरच रेल्वे पटरीवरून होणारे धोकादायक मार्गक्रमण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Washim
Washim Cows Death : पिंपरी फॉरेस्ट परिसरात १५ गायी मृतावस्थेत आढळल्या

वयोवृद्ध आणि लहान मुलांना घेऊन प्रवास करणाऱ्या कुटुंबांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर आणि प्रवाशांच्या सुरक्षित मार्गक्रमणाच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे दृश्य असल्याची चर्चा प्रवाशांमध्ये सुरू आहे. प्रशासनाने एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Washim
Washim Police Raid | वाशीममधील देहविक्री अड्ड्यावर पोलिसांचा छापा; दोन संशयित ताब्यात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news