Washim News | वाशिम : विधी सेवा महाशिबीरातून हजारो नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ

उच्च न्यायालयाच्या पालक न्यायमूर्तींच्या हस्ते महामेळाव्याचे उद्घाटन
Washim Legal Services Camp
Washim Legal Services Camp Pudhari
Published on
Updated on

Washim Legal Services Camp

वाशिम: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशिम, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम व जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला.

महाशिबीराचे उद्घाटन उच्च न्यायालय, मुंबईचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती, वाशिम अभय ज. मंत्री आणि उच्च न्यायालय, मुंबई (नागपूर खंडपीठ)चे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती, वाशिम महेंद्र एम. नेरलीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

Washim Legal Services Camp
Washim News | जिल्ह्यात कलम ३७ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू

यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशिम अनिल सुब्रमण्यम, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पीत चौहान, अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर,जिल्हा शल्य चिकित्सक अनिल कावरखे, मुख्याधिकारी निलेश गायकवाड, अध्यक्ष, जिल्हा विधीज्ञ मंडळ, वाशिम अनुप बाकलीवाल यांच्यासह सर्व न्यायिक अधिकारी, जिल्ह्यातील विधीज्ञ मंडळाचे सदस्य, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाशिबिरामध्ये विविध विभागांच्या शासकीय योजनांचे एकूण ३६ स्टॉल्स उभारण्यात आले होते. या स्टॉल्सच्या माध्यमातून नागरिकांना एकूण ५२ शासकीय योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी सर्व स्टॉल्सना भेट देऊन योजनांची अंमलबजावणी व लाभ वितरणाची माहिती घेतली.

Washim Legal Services Camp
Washim News | वाशिमच्या कशिश बयसला बेसबॉल स्पर्धेत कांस्यपदक

महामेळाव्यात कृषी विभागामार्फत श्रीराम मोरे यांना ट्रॅक्टर व ज्योती घुले यांना हार्वेस्टरचे वितरण करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत सुलभा राजू रोकडे व अलका घोलप यांना फिरते विक्री केंद्राची गाडी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. याशिवाय जीजाबाई मेंडके यांना विहिरीचा लाभ, संतोष देखने यांना अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत रेशन कार्ड तसेच वैष्णवी मुठाळ यांना अधिवास योजनेचा लाभ देण्यात आला.

जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम मार्फत नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी ‘मिनी हॉस्पिटल’चा स्वतंत्र स्टॉल लावण्यात आला होता. या ठिकाणी विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. आरोग्य विभाग व संबंधित यंत्रणांकडून शासनाच्या विविध आरोग्य व कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली.

Washim Legal Services Camp
Washim News | मंगरुळपीर तालुक्यात समृध्दीत गेलेल्या जमीनीत घोटाळा झाल्याचा आरोप

या विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचा लाभ वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी घेतला. वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. जी. चौखंडे यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news