Washim News | मंगरुळपीर तालुक्यात समृध्दीत गेलेल्या जमीनीत घोटाळा झाल्याचा आरोप

प्रशासन काय दखल घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Washim News
Washim News
Published on
Updated on

वाशिम : शेतातुन गैरकायदेशीररित्या समृध्दी महामार्गाचे काम केले.शेतीचा मोबदला दिल्या गेला नाही. वारंवार प्रशासनाला निवेदने देवुनही दखल न घेतल्याने आता आमच्या शेतीच्या हद्दीतुन गेलेल्या समृध्दी महामार्गच १६ फेब्रुवारीला रोखणार असल्याचे लेखी निवेदन पिडित शेतकरी गजानन राऊत यांनी सबंधित प्रशासनाला दिले आहे. यावर प्रशासन काय दखल घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्मुध्दी महामार्गात घोटाळा झाला आहे सदर महामार्ग तहसीलदार मगरुळपिर यांचे आदेशाप्रमाणे आमचे शेतातून गैर कायदेशीर सुरु आहे तो १६ फेब्रुवारी पासून कायम स्वरुपात बंद करणार आहोत.अशा आशयाचे लेखी प्रशासनाला दिले आहे.तहसीलदार मगरुळपिर यांनी दिनांक ३० जुलै रोजी पारीत केलेल्या आदेशाप्रमाणे तलाठी मौजा भुर तसेच मंडळ अधीकारी शेलुबाजार हे कार्यवाही करीत नसल्याने अर्जदार यांनी आपणा कडे अनेक तक्रारी करुन सुध्दा अधिकारी यांचेवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. दिनांक ३० जुलै रोजी आदेश पारित करून तलाठी मौजा भुर तसेच तलाठी मौजा वनोजा व मंडळ अधिकारी शेलुबाजार यांनी ७/१२ तसेच फेरफार घेऊन अनुपालन करावे करीत आदेश दिला आहे.

तहसीलदार यांनी पारीत केलेल्या आदेशाप्रमाणे तलाठी व मंडळ अधिकारी यांनी ९ हे ३४ आर जमीनीचा ७/१२ व फेरफार घेणे आवश्यक असतांना तलाठी व मंडळ अधिकारी यांनी आदेशातील ७ हे ६५ आर जमिनीच्या नोंदी केल्या आहेत.तलाठी व मंडळ अधिकारी यांनी पदाचा गैरवापर केल्याने आदेशातील १ हे ६९ आर जमीनीच्या नोंदी बाकी आहेत. आदेशात नमूद केल्याप्रमाणे उर्वरित १ हे. ६९ आर. जमिनीमध्ये अर्जदार यांची आई मयत सुमीत्राबाई भोलेनाथ राऊत, अर्जदार गजानन भोलेनाथ राऊत तसेच भोलेनाथ चद्रभान राऊत आणि मोरेश्वर भोलेनाथ राऊत यांचा १/४ हीसा नमुद केला आहे.

सदर आदेशाप्रमाणे अर्जदार याचा त्या जमिनी मध्ये १/२ हीस्सा आहे.वारंवार निवेदने देवुनही दखल घेवुन न्याय न मिळाल्याने पिडित शेतकरी गजानन राऊत हे दि.१६ फेब्रुवारीपासुन चक्क समृध्दी महामार्गावरील वाहतुक रोखणार असल्याचा ईशारा दिला आहे.यावर प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news