Washim : 'कोरडा दुष्काळ जाहीर करा; 8 दिवसांत निर्णय द्या, न झाल्यास शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार'

Washim : मनसेचा आक्रोश मोर्चा
washim
Washim
Published on: 
Updated on: 

वाशिम : वाशीम जिल्ह्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने, जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने २४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन आक्रोश मोर्चा काढला.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. बसस्थानक, जिल्हा क्रीडा संकुल, देशमुख हॉस्पिटल, सिव्हिल लाईन, शासकीय विश्रामगृह मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मनसे जिल्हा प्रमुख राजू पाटील किडसे यांनी सहभागी शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

washim
Washim Police : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त

पावसाच्या खंडामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे कोणत्याही अटी-शर्ती न लावता सरसकट हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी तसेच वाशिम जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

washim
Devendra Fadnavis Field Visit | नुकसानग्रस्त पिकांची मुख्यमंत्र्यांकडून बांधावर जाऊन पाहणी; भरपाई देण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार

राज्य व केंद्र सरकारने येत्या आठ दिवसांत कोरडा दुष्काळ जाहीर न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी, मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.

मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे यांनी केले. यावेळी कारंजा -मानोरा जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर, रिसोड -मालेगाव उपजिल्हाध्यक्ष अतीश डहाळ,  वाशिम- मंगरूळपीर उपजिल्हाध्यक्ष उमेश टोलमारे, कृषी सेना जिल्हा अध्यक्ष विठ्ठल भाऊ राठोड, वाशिम तालुका अध्यक्ष विठ्ठल राठोड, मंगरूळपीर तालुका अध्यक्ष लक्ष्मण जाधव, रिसोड तालुका अध्यक्ष योगेश, मानोरा तालुका अध्यक्ष संतोष घोडे, मालेगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, कारंजा शहराध्यक्ष कपिल महाजन, मालेगाव कृषी सेना तालुका अध्यक्ष रवी पवार, वाशिम शहर उपाध्यक्ष गजानन इंगोले, उपशहर अध्यक्ष वाशिम आकाश लोलप, मनसे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news