Washim Police : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त

४३० उपद्रवी व्यक्तींविरुद्ध कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई; ३ आरोपींवर तडीपारीची कारवाई
Washim Police
प्रातिनिधीक छायाचित्रFile Photo
Published on
Updated on

वाशीम : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाईला वेग दिला आहे. त्याअनुषंगाने ४३० उपद्रवी व्यक्तींविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता ४३०उपद्रवी लोकांविरुध्द कलम १६३ भारतिय नागरीक सुरक्षा संहीता २०२३अन्वये तर ०३ आरोपीतांविरुध्द कलम ५६ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये तडीपारीची कारवाई.

वाशिम जिल्हयामध्ये दिनांक २५. ०९. २०२६ ते २७.०९.२०२६ पावेतो गणेश विसर्जन मिरवणुका आहेत. गतकाळात बरेच उपद्रवी लोकांकडुन गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान मद्य प्राशन करुन गोंधळ घालणे, बरेच वेळ मिरवणुक रंगाळत ठेवणे, पोलीसांनी दिलेले आदेश न मानणे आदी प्रकारचे कार्य केल्याचे दिसुन येत आहे. गणेश विसर्जन मिरवणुक वेळेत न संपल्याने विसर्जन मिरवणुकीच्या रांगेत शेवटी असलेल्या गणेश मंडळांना पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे रांगेत शेवटी असलेल्या मंडळाचा हिरमोड होतो. सदर बाब हेरुन पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे पाटील यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये अशा प्रकारे अडथळे निर्माण करणारे लोकांवर कठोर प्रतिबंधक कारवाई करण्याचे नियोजन केले. त्याबाबत श्रीमती लता फड, अपर पोलीस अधीक्षक, वाशिम यांना आदेश दिले.

श्रीमती लता फड, अपर पोलीस अधीक्षक, वाशिम यांनी वाशिम जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन कडुन गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये अडथळे निर्माण करणारे उपद्रवी लोकांची यादी करवून घेतली. मिरवणुकीचे काळात गावात/शहरात /पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शांतता व सुव्यवस्थेस बाधा पोहचू नये याकरीता सर्व ठाणेदार यांचेकडून अशा लोकांचे कलम १६३ (१) भारतीय नागरिक सुरक्षा संहीता अन्वये प्रस्ताव तयार करवून घेतले. सदरचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांचेकडे पाठवून वाशिम जिल्हयामधून ४३० उपद्रवी लोकांना कलम १६३ भारतीय नागरीक सुरक्षा संहीता २०२३ नुसार गावात/शहरात/पोलीस स्टेशन हद्दीत राहु नये असे आदेश काढण्याबाबत विनंती केली.

त्यानुसार दिनांक २५. ००. २०२६ ते २७. ०९. २०२६ पावेतो वाशिम जिल्हयामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचे काळात एकुन ४३० उपद्रवी लोकांना गावामधे शहरामध्ये/पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहु नये याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. तसेच ०३ समाजकंटकांना कलम ५६ (ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये तडीपार करण्यात आले आहे.

तसेच पोलीस अधीक्षक वाशिम यांचेकडुन वाशिम जिल्हयातील सर्व गणेश मंडळाचे लोकांना मिरवणुक वेळेत सुरु करणे, जास्त वेळ एकाच ठिकाणी रेंगाळत ठेऊ नये, शांतता व सुव्यवस्था अबाधित राहील. तसेच कोणीही वाहनांवर शस्त्रे लावणार नाही, शासनाने ठरवून दिलेल्या डेसीबल नुसार डॉल्बीचे आवाजाची मर्यादा ओलांडून ध्वनीप्रदूषण कायदयाचे उल्लघन करु नये आदी बाबींची दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. तसेच कायदा मोडणाऱ्यांची गय केली जाणार नसुन अशा समाजकंटका विरुध्द कठोर कारवाई केली जाईल असा ईशारा सुध्दा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news