Devendra Fadnavis Field Visit | नुकसानग्रस्त पिकांची मुख्यमंत्र्यांकडून बांधावर जाऊन पाहणी; भरपाई देण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार

म्हसला, मोहगव्हाण, जऊळका येथे पीक-पाणी परिस्थितीचा घेतला आढावा
 Washim Crop Damage Inspection
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली.Pudhari
Published on
Updated on

Washim Crop Damage Inspection

वाशिम : अल्प पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (दि. २४) वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. कारंजा तालुक्यातील म्हसला, मंगरुळपीर तालुक्यातील मोहगव्हाण आणि मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पीक व पाणी परिस्थितीचा आढावा घेतला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या शासनाच्या घोषणेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

पश्चिम विदर्भातील, विशेषतः अमरावती विभागातील पीक-पाणी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे सकाळी अमरावती विमानतळावर शासकीय विमानाने आगमन झाले. त्यानंतर मोटारीने ते वाशिम जिल्ह्यात दाखल झाले.

कारंजा तालुक्यातील म्हसला येथे शेतकरी देविदास किशन काळे यांच्या शेतात जाऊन त्यांनी नुकसानग्रस्त सोयाबीन व तूर पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली.

 Washim Crop Damage Inspection
Washim Robbery | वाशिम-मालेगाव महामार्गावर लुटमार करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

यानंतर मंगरुळपीर तालुक्यातील मोहगव्हाण येथे शेतकरी अनिल भगरे आणि अब्दुल नईम शेख रहीम यांच्या शेतातील पिकांची पाहणी करण्यात आली. कमी पावसामुळे सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

‘अल्प पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. मात्र, शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. शासन त्यांच्या पाठीशी आहे. नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत केली जाईल. यासंदर्भातील अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे शेतकरी संतोष सखाराम डुंबळे यांच्या शेताच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. संतोष डुंबळे यांच्या आई शकुंतलाबाई यांनीही दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.

 Washim Crop Damage Inspection
Washim Crime |अश्लिल व्हिडीओ असलेली लिंकचा ‘क्यु आर’ कोड स्कॅनर चिकटवणाऱ्या तिघांना न्यायालयीन कोठडी!

या दौऱ्यात फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या शासनाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ‘अल्प पावसामुळे आसमानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल. झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन आवश्यक मदत प्राधान्याने आणि लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांसोबत आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी, यासाठीही दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात येतील. शासनाची मदत शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी लवकरच कार्यवाही सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 Washim Crop Damage Inspection
Washim News: वाशिममध्ये सावत्र बापाने केला १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोस्को अंतर्गत पोलिसात गुन्हा दाखल

यावेळी खासदार संजय देशमुख, खासदार अनुप धोत्रे, आमदार बाबुसिंग महाराज, आमदार सईताई डहाके, आमदार अमित झनक, आमदार श्याम खोडे, आमदार रणधीर सावरकर, आमदार भावना गवळी, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, संबंधित विभागांचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news