Washim crime: अपंगत्व प्रमाणपत्रासाठी ४ हजारांची लाच घेणाऱ्या खासगी इसमाला रंगेहात पकडले

लाचेची तक्रार प्राप्त होताच एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष या प्रकरणाची पडताळणी केली
Bribery Case
Bribery Case Pudhari
Published on
Updated on

वाशीम : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्थिरोग विभागात गरिबांची आणि गरजूंची होणारी पिळवणूक अखेर चव्हाट्यावर आली आहे. स्वतः जिल्हा रुग्णालयाचा कर्मचारी असल्याचे खोटे सांगून रुग्णांची फसवणूक करणाऱ्या आणि अपंगत्वाचे नवीन प्रमाणपत्र देण्यासाठी एका दिव्यांग व्यक्तीकडे लाचेची मागणी करणाऱ्या एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. सतीश बबन कवर (वय ३३ वर्ष, रा. तामसी, ता. जि. वाशीम) असे या लाचखोर खासगी इसमाचे नाव आहे.

Bribery Case
Parbhani Bribe Case : दुचाकी नावावर करण्यासाठी १,३०० रुपयांची लाच घेताना आरटीओचे दोन लिपिक एसीबीच्या जाळ्यात

याबाबत सविस्तर वृत्त असे की, एका ५६ वर्षीय दिव्यांग तक्रारदाराच्या ४१ टक्के अपंगत्व प्रमाणपत्राची मुदत संपली होती. त्यामुळे त्यांनी नवीन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नावे ऑनलाइन अर्ज करून पावती भरली होती. मात्र, हे प्रमाणपत्र देण्यासाठी अस्थिरोग कक्षात खासगी इसम सतीश कवर याने स्वतः रुग्णालयाचा कर्मचारी असल्याचे खोटे भासवत तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. आणि त्यानंतर १० हजार रुपयांची लाच मागितली. हक्काचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लाच द्यावी लागत असल्यामुळे व्यथित झालेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली.

Bribery Case
Jalna ACB Bribery Raid- सावकारी परवान्यासाठी मागितली लाच

लाचेची तक्रार प्राप्त होताच एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष या प्रकरणाची पडताळणी केली. तडजोडीअंती खासगी इसम सतीश कवर हा ४ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला. लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रुग्णालय परिसरात सापळा रचला. तक्रारदाराकडून लाचेची ४ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने या खासगी इसमाला रंगेहात पकडले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या.

Bribery Case
Chandrapur Bribe Case : ८ हजारांची मागणी, ३ हजारांवर तडजोड; महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला लाच घेताना अटक

कारवाईदरम्यान आरोपीच्या अंगझडतीतून लाचेच्या रकमेसह एकूण ४ हजार २४५ रुपये आणि एक ओप्पो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आरोपीच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी वाशीम शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हा दाखल होताच आरोपीला रीतसर अटक करण्यात येणार आहे.

Bribery Case
Jalgaon Bribe | ३० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी जामनेर पंचायत समितीच्या तांत्रिक सहाय्यकावर गुन्हा

ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशीमचे पोलीस उपअधीक्षक जगदीश परदेशी यांच्या मार्गदर्शनात अत्यंत गोपनीयतेने यशस्वीरीत्या पार पाडली. सापळा पथकातील पोलीस हवालदार विनोद मारकंडे, पोलीस हवालदार नितीन टवलारकर आणि पोलीस हवालदार योगेश खोटे (सर्व लाप्रवि वाशीम) यांनी या कारवाईत सहाय्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news