Washim Farmer Loan Waiver | वाशिममध्ये अडीच हजार शेतकऱ्यांना एकवेळ समझोता कर्जमुक्तीचा लाभ

६४८ गावांतील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध; दोन लाखांवरील रक्कम भरून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
 Farmer Loan Waiver Scheme
Farmer Loan Waiver Schemepudhari photo
Published on: 
Updated on: 

Washim One Time Settlement Scheme

वाशिम : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या दुसऱ्या टप्प्यातील एकवेळ समझोता योजनेची पहिली यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील ६४८ गावांमधील २ हजार ५६७ पात्र शेतकऱ्यांचा या यादीत समावेश असून, संबंधित शेतकऱ्यांनी दोन लाख रुपयांवरील कर्जाची रक्कम भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी यादीतील आपले नाव व कर्जाचा तपशील तपासून दोन लाख रुपयांवरील कर्जाचा हिस्सा संबंधित बँकेत जमा करणे आवश्यक आहे. एकापेक्षा अधिक कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही एका खात्यात ही रक्कम भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, समझोता योजनेनुसार निश्चित केलेल्या देय रकमेपेक्षा अधिक रक्कम भरू नये. रक्कम भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२७ आहे.

 Farmer Loan Waiver Scheme
Washim News | विहिरीत बुडालेल्या दोन मजुरांचे मृतदेह तीन तासांच्या प्रयत्नांनंतर बाहेर!

तालुकानिहाय लाभार्थी

जिल्ह्यातील तालुकानिहाय पात्र शेतकऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. वाशिम तालुक्यात ७६९, रिसोड ४५७, मालेगाव २५९, मंगरुळपीर २७८, कारंजा ५४७ आणि मानोरा तालुक्यातील २५७ शेतकरी पात्र ठरले आहेत. या लाभार्थ्यांचा संबंध जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच राष्ट्रीयीकृत, ग्रामीण आणि खासगी बँकांशी आहे.

शेतकऱ्यांनी कर्जाचा हिस्सा भरल्यानंतर संबंधित बँका दर शुक्रवारी त्याची माहिती पोर्टलवर अपलोड करतील. कर्जाची थकबाकी अद्ययावत झाल्यानंतर तीन दिवसांनी आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांनाच आधार प्रमाणीकरण करता येईल. त्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतचा कर्जमुक्ती लाभ दिला जाणार आहे.

 Farmer Loan Waiver Scheme
Washim News | अमरावती विभागातील दुष्काळग्रस्त १२ लाखांवर शेतकऱ्यांच्या खात्यात ६४१ कोटींची लाखाची दिवाळी मदत जमा!

एकवेळ समझोता योजनेची ही पहिली यादी असून, बँकांकडील माहितीचे संगणकीय संस्करण पूर्ण झाल्यानंतर पुढील याद्याही प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. मयत, वयोवृद्ध तसेच बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचण येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी १९ ऑगस्ट २०२६ रोजीच्या मानक कार्यप्रणालीनुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.