Unseasonal rain | जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली....

हवामान असेच राहिल्यास आपली मेहनत वाया जाईल, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे
Rain
RainPudhari
Published on
Updated on

वाशीम : वाशिम जिल्ह्यातील हवामानाने गुरुवारी अचानक वेगळे वळण घेतले. दुपारी अनेक भागांमध्ये जोरदार मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली, तर काही ठिकाणी गारपिटीचेही प्रदर्शन झाले. या अचानक हवामान बदलामुळे जनजीवन तात्पुरते विस्कळीत झाले, परंतु याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसलेला दिसतो.

Rain
Unseasonal Rain : बीड, हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका

जिल्ह्यात सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू आहे. त्यामुळे, गहू, हरभरा आणि कांदा यांसारख्या उभ्या पिकांचे पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. आंबा आणि इतर फळबागांचेही नुकसान होऊ शकते. हवामान असेच राहिल्यास आपली मेहनत वाया जाईल, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

Rain
Solapur unseasonal rain: अवकाळी; गारपिटीने द्राक्ष, आंबासह धान्याचे नुकसान

हवामान विभागाने पुढील दोन दिवस जिल्ह्यात पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा आणि आपल्या पिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या आकाशात ढग जमा होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. आता सर्वांचे लक्ष येत्या काही दिवसांतील हवामानावर लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news