IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांना नाहक त्रास देणे थांबवा

ओबीसी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
IAS officer Pooja Khedkar News
पूजा खेडकर यांच्याबाबत ओबीसी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.Pudhari News Network

वाशिम : वाशीम जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयएएस अधिकारी पूजा खेडकर परीविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना काही दिवसांपासून विविध प्रसार माध्यमांसह काही संघटनाद्वारे मानसिक त्रास दिला जात आहे. एका आयएएस महिला अधिकाऱ्याला नाहक त्रास देणे योग्य नाही. त्या ओबीसी प्रवर्गातून असल्यामुळे जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करू नये, अशी मागणी जिल्ह्यातील ओबीसी संघटनेने मंगळवारी (दि.१६) जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

IAS officer Pooja Khedkar News
IAS Officer Pooja Khedkar| पूजा खेडकरचे पाय खोलात!

या निवेदनात म्हटले आहे की, आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबतीत प्रसार माध्यमाने पुराव्याशिवाय विनाकारण प्रसिद्धी देऊ नये, यामुळे पुजा खेडकर यांना मानसिक दृष्टया त्रास होत आहे. तसेच त्या दिव्यांग व महिला अधिकारी असल्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, खेडकर यांच्या चौकशीबाबत केंद्र सरकारने जी समिती नेमली आहे. त्या समितीमार्फत जी चौकशी होईल, ती करण्यास कोणाचीही काही हरकत नसावी, असे निवेदनात नमूद आहे. याबाबत मागण्यांची पूर्तता न झाल्यास ओबीसी बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही जिल्ह्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे.

IAS officer Pooja Khedkar News
IAS Pooja Khedkar : अखेर पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण स्थगित

यावेळी प्रा. डॉ. अनिल राठोड, इंजि. सीताराम वाशीमकर, डॉ. रवी जाधव, किरणताई गिऱ्हे, गजानन धामणे, शितल राठोड, नागेश काळे, संदीप चिखलकर, शंकर वानखेडे, विष्णू राठोड, मिलिंद सुर्वे, छायाताई मडके, भगवान मडके, ज्ञानेश्वर गोरे, गजानन भेंडेकर, ओमप्रकाश फड, राहुल काळुसे, प्रल्हाद पाटील पौळकर, प्रा. अनिल काळे, सुनील कायंदे, अनिल गरकळ, केशव गरकळ, महादेव घुगे, रामराव कायंदे, अक्षय सानप यांच्यासह असंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news