IAS Officer Pooja Khedkar| पूजा खेडकरचे पाय खोलात!

डाव्या गुडघ्यात अधू, परीक्षेत नावातही बदल
IAS officer Pooja Khedkar
पुजा खेडकर यांच्या वैद्यकीय शिक्षणासंदर्भात महत्त्वाची माहितीPudhari News Network
Published on
Updated on

पुणे: जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी काळातच वादग्रस्त ठरलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे पाय आणखी खोलात चालले आहेत. त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र दिले असल्याचे समोर आले आहे. त्याच बरोबर यूपीएसीच्या परीक्षा त्यांनी दोन नावाने दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

IAS officer Pooja Khedkar
Monsoon Update| आज-उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्याला 'रेड अलर्ट'

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे एकानंतर अनेक कारनामे समोर येत आहेत. आपल्या खासगी कारवर अंबर दिवा लावून अधिकारी पदाचा रुबाब दाखवल्यानंतर त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या.

मात्र, पूजा खेडकर यांच्या आयएएस अधिकारी पदाच्या निवडीवरच आता अनेक शंका उपस्थित होत आहेत. कारण, अपंगत्वाचं प्रमाणपत्र दाखवून त्यांनी ही सनदी अधिकारीपदाची नोकरी मिळवली, पण ज्या महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएस पदाची पदवी मिळवली, त्या महाविद्यालयाकडे आपण शारीरिकदृष्ट्या फीट असल्याचं प्रमाणपत्र त्यांनीच दिलं असल्याचे उघडकीस आले आहे.

त्यातच, आता पिंपरी-चिंचवड पालिकेतून त्यांना पायासाठी अपंगत्वाचंही प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. खेडकर यांची पुणे जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

सध्या अकोला येथे त्यांना प्रकल्प अधिकारी म्हणून नेमण्यात आलं असून, १९ जुलैपर्यंत त्यांना तेथील कार्यभार देण्यात आला आहे. दुसरीकडे त्यांच्यावरील आरोपांसाठी केंद्र सरकारने १ सदस्यीय समिती नेमली असून, त्यांच्या यूपीएससीतील निवडीसंदर्भात चौकशी सुरू आहे.

पूजाच्या आजारपणात वाढ

डाव्या गुडघ्यात ७ टक्केवारीने पूजा खेडकर या कायमस्वरूपी अधू असल्याचं या प्रमाणपत्रात नमूद करण्यात आले आहे. २४ ऑगस्ट २०२२ रोजी हे प्रमाणपत्र वायसीएम रुग्णालयाने पूजा खेडकरांना दिले होते. याआधी पूजा खेडकर यांना कमी दिसत त्याअनुषंगाने त्यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवल्याने त्या चर्चेत होत्या. अशातच आता डाव्या गुडघ्याच्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र समोर आलेलं आहे. त्यामुळे, पूजा खेडकर यांच्या अपंगत्वाबाबतही संशय आणि शंका वाढल्या आहेत.

यूपीएससीच्या यादीत दोन्ही नावांची नोंद

प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या यूपीएससी परीक्षाचे अटेम्प्ट संपले होते. परीक्षा देता यावी यासाठी त्यांनी नावात बदल करून परीक्षा दिली. पूजा खेडकर यांनी ११ वेळा यूपीएससी परीक्षा दिली. २०१९-२० पर्यंत पूजा दिलीपराव या नावाने परीक्षा दिली. २०२१-२२ मध्ये त्यांनी नावात बदल केला.

पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावाने यूपीएससीची परीक्षा दिली. पूजा खेडकर यांच्या दोन्ही नावांच्या यूपीएससीमध्ये लिस्ट आहेत. प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांचे यूपीएससी परीक्षाचे अटेम्प्ट संपले होते. परीक्षा देता यावी यासाठी त्यांनी नावात बदल करून परीक्षा दिली.

पूजा खेडकर यांनी ११ वेळा यूपीएससी परीक्षा दिली. २०१९-२० पर्यंत पूजा दिलीपराव या नावाने परीक्षा दिली. २०२१-२२ मध्ये त्यांनी नावात बदल केला. पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावाने यूपीएससीची परीक्षा दिली. पूजा खेडकर यांच्या दोन्ही नावांच्या यूपीएससीमध्ये लिस्ट आहेत.

IAS officer Pooja Khedkar
Nifty 50 ची विक्रमी घौडदौड कायम! पहिल्यांदाच २४,६५० वर

वैद्यकीय तपासण्या करूनच प्रमाणपत्र पिंपरी :

पूजा खेडकर यांनी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून बायसीएम रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र घेतले असल्याची माहिती समोर आल्याने याबाबत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, २४ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांना हे प्रमाणपत्र दिले आहे. ७ टक्के अस्थिव्यंग असल्याचे या प्रमाणपत्रात नमूद आहे. त्यांच्या एका गुडघ्यामध्ये ही समस्या आहे. सर्व वैद्यकीय तपासण्या करुनच हे प्रमाणपत्र दिले आहे. त्यामध्ये चुकीचे काही झालेले नाही, मी याबाबत माहिती घेतली आहे. तथापि, याविषयी विचारणा झाल्यास चौकशी करण्यात येईल. महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याशी मात्र याबाबत संपर्क होऊ शकला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news