Pohradevi Ram Janmotsav | पोहरादेवीत घुमला 'जय श्रीराम', 'जय सेवालाल' जयघोष; देशभरातून उसळला भाविकांचा जनसागर

मयार्दा पुरुषोत्तम श्रीराम भगवान यांचा जन्मोत्सव उत्साहात
Shri Ram Janmotsav Pohradevi 2026
Shri Ram Janmotsav Pohradevi 2026 Pudhari
Published on
Updated on

Shri Ram Janmotsav Pohradevi 2026

वाशिम : मानोरा तालुक्यातील बंजारा समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील देवी जगदंबा माता, संत सेवालाल महाराज व संत रामराव बापू मंदिर सेवा आश्रमात मयार्दा पुरुषोत्तम श्रीराम भगवान यांचा जन्मोत्सव पाळणा गीत, भोग भंडारा, आरदास व महाआरती करून लाखो भाविकांच्या साक्षीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जय श्रीराम, जय सेवालाल, जय रामराव बापू यांच्या नावाच्या जयघोषाने पोहरादेवी नगरी दुमदुमून गेली होती.

देशभरातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान बहुजन, बंजारा तिर्थक्षेत्र पोहरादेवी व उमरी खुर्द येथे दरवर्षी रामनवमी निमित्त यात्रा महोत्सव हर्ष उल्हासात साजरा केला जातो. यावर्षी गुरुवारी दि. २६ मार्च रोजी सुध्दा रामनवमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Shri Ram Janmotsav Pohradevi 2026
Washim Fuel Supply | अफवांना बळी पडू नका; जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध

रामनवमी दिनी मयार्दा पुरुषोत्तम श्रीराम यांचा जन्मोत्सव दुपारी १२ वाजता संत सेवालाल महाराज व जगदंबा माता मंदिरात महंत कबिरदास महाराज यांच्या हस्ते व संत डॉ‌.रामराव बापू सेवा आश्रमात धर्मगुरु आ. बाबुसिंग महाराज व बापू भक्त शेखर महाराज यांच्या हस्ते पाळणा, भोग भंडारा, आरदास व महाआरती करून लाखो सेवा भक्तांच्या साक्षीने साजरा करण्यात आला. रामनवमी यात्रा महोत्सव निमित्त आदल्या दिवसापासूनच श्रीराम जन्मोत्सव व देवी, संताचे आशीर्वाद व यात्रा महोत्सवासाठी देशभरातील महाराष्ट्र नव्हे कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली आदीसह लाखो भाविकांनी हजेरी लावली होती.

नांदेड, परभणी, मंठा, जालना आदीसह इतर भागातून पायदळ दिंडीद्वारे हजारो सेवा भक्त दर्शनासाठी दाखल झाले होते. त्यांचा मंदीर संस्थानच्यावतीने महंतांनी स्वागत करून सत्कार केला. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, तेलंगणा व कर्नाटकचे आजी माजी मंत्री, समाजातील प्रतिष्ठीत नागरीक व मान्यवर यांनी श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याला हजेरी लावून देवी जगदंबा माता व संताच्या समाधीस्थळी माथा टेकून दर्शन घेतले.

रांगेत उभे राहून हजारो भाविकांची दर्शन घेण्यासाठी गर्दी जमली होती. त्यानंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी शेतात, झाडाखाली व मिळेल त्या ठिकाणी भाविक नवस फेडताना जमले होते. यात्रा महोत्सवात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवला होता.

Shri Ram Janmotsav Pohradevi 2026
Washim News : मालेगाव येथील तरुणाच्या हत्येप्रकरणी आरोपीला आजिवन कारावासाची शिक्षा; जिल्हा न्यायालयाचा निकाल

यात्रा महोत्सवात प्रशासनाच्या वतीने आरोग्य विषयक सुविधा, पिण्याचे आणि आदींची व्यवस्था केली होती. अनेक स्वयंसेवी संस्थांनी भाविक भक्तांना अन्नदान कार्यक्रम राबवून सेवा दिली. रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने पोहरादेवीत समाज बांधवांच्यावतीने सामाजिक, सांस्कृतिक विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.

भक्तीधाम येथे जितेंद्र महाराज यांच्या हस्ते भगवान श्रीराम यांचा जन्मोत्सव थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविक भक्तांनी हजेरी लावत महाप्रसादाचा लाभ घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news