

Petrol Diesel Stock Washim
वाशिम: जिल्ह्यातील काही भागांत पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेलच्या खरेदीसाठी नागरिकांकडून अनावश्यक गर्दी (panic buying) होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजी (Domestic LPG) यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
कोणत्याही प्रकारची तुटवडा परिस्थिती निर्माण झालेली नसून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. घाबरून जास्त प्रमाणात इंधन खरेदी करण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी व प्रशासनास सहकार्य करावे.
जिल्हा प्रशासनाकडून इंधनाचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात आलेली असून, नागरिकांनी संयम व जबाबदारीने वागावे, असे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दीपक बाजड यांनी दिली आहे.