Vashim News : वीज कोसळून मुलीचा मृत्यु; दुसरी मुलगी जखमी

Vashim News : वीज कोसळून मुलीचा मृत्यु; दुसरी मुलगी जखमी

Published on

वाशिम, पुढारी वृत्तसेवा : अंगणात खेळत असताना, मौजे जांब (ता. मंगरूळपीर) येथे गुरुवार (दि.9) रोजी दुपारी 2:00 च्या सुमारास अवकाळी पाऊसात अंगावर वीज पडून मुलीचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. दुर्गा दिनेश कांबळे (वय.12) असे मृत मुलीचे नाव आहे. तर दुसरी मुलगी जखमी आहे. (Washim News)

अंगणात तीन मैत्रीणी खेळत असताना अवकाळी पावसात दुर्गा कांबळेचा जागीच मृत्यृ झाला तर तिची  मैत्रीण रविना धम्म‌पाल सुर्वे (वय.12) ही जखमी झाली. जखमी रविना हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खेळत असताना वीज कोसळून दुर्गाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Washim News)

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news