Mahad Heatwave: महाडमध्ये उन्हाचा तडाखा तीव्र; तापमान ४५ अंशांच्या उंबरठ्यावर

उष्णतेमुळे आरोग्यावर परिणाम; तज्ञांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा
(छायाचित्र- श्रीकृष्ण बाळ)
(छायाचित्र- श्रीकृष्ण बाळ)Pudhari
Published on
Updated on

महाड : श्रीकृष्ण बाळ

महाड आणि परिसरात आता सूर्य आग ओकत असून गेली दोन दिवसांपासून उष्म्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे याचा परिणाम मानवी आरोग्यासह दैनंदिन जीवनावर होऊ लागला आहे.

मार्च महिना सरत असताना आणि एप्रिल महिना सुरू होण्यापूर्वी सूर्य आग ओकत आहे गेली काही दिवसांपासून तापमानामध्ये चढ उतार होत असतानाच बुधवारपासून या तापमानात अचानक वाढ झाली आहे तापमानाचा पारा अचानक चढल्यामुळे वातावरण चांगले तापले आहे सगळीकडे प्रचंड उष्मा जाणवत असल्याने अंगाची लाही लाही होत आहे या वाढलेल्या तापमानामुळे बाजारपेठेवर देखील परिणाम दिसून येत आहे

(छायाचित्र- श्रीकृष्ण बाळ)
JNPA Shipping: जेएनपीएची नवी झेप! मध्यपूर्वेसोबत सागरी संपर्क बळकट करणाऱ्या सेवेला सुरुवात

मानवी आरोग्य या उन्हामुळे बिघडू लागले आहे यामुळे मळमळ उलटी डोकेदुखी अपचन असे आजार डोके वर काढत आहेत गेली दोन दिवसांपासून पारा चढल्यामुळे वातावरणामध्ये 45डिग्री अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत आहे काही ठिकाणी पाऊस देखील पडत असल्याने तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या बदलत्या तापमानामुळे कृषी क्षेत्रावर देखील परिणाम दिसून येत आहे.

(छायाचित्र- श्रीकृष्ण बाळ)
Kankavli Contractor Murder: कणकवलीतील बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्त्या

उन्हात बाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन देखील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून केले जात आहे भरपूर पाणी पिणे डोक्यावर टोपी तसेच चेहऱ्याभोवती स्कार्फ बांधूनच बाहेर पडणे योग्य ठरणार आहे. यासंदर्भात शासकीय रुग्णालयाच्या स्तरावरून अत्यावश्यक कामांकरिता दुपारच्या वेळेत बाहेर पडावे असे सुचित केले जात असून पाण्याचा वापर करावा असे सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news