

First World Banjara Dialect Conference in Washim
वाशीम : अखिल भारतीय तांडा सुधार समिती, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पहिल्या विश्व बंजारा बोलीभाषा संमेलन होणार आहे. वाशिम येथे दि. २६ आणि २७ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. पहिल्या विश्व बंजारा बोलीभाषा संमेलनाच्या मुख्य संयोजक पदी साहित्यिक डॉ. विजय जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
स्वागत अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव जाधव यांच्याकडे सापवण्यात आल्याची माहिती या संमेलनाचे संयोजक डॉ. प्रकाश राठोड यांनी आज जाहीर केले आहे.
बोलीभाषा संमेलनाला नियोजनाला आता गती मिळाली आहे. या संमेलनाच्या विविध महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्यांसाठी प्रमुख नावांची घोषणा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश राठोड यांनी आयोजित आभासी सभेत केली. सभेला बंजारा बोलीभाषेचे अभ्यासक, साहित्यिक, कवी, विचारवंत, वक्ते, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या सभेत संमेलनाच्या मुख्य संयोजकपदी साहित्यिक डॉ. विजय जाधव आणि प्रसिद्ध लोकशाहीर श्रावण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. रमेश राठोड यांना या प्रसंगी प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेचे संपादक, तर डॉ. विष्णू चव्हाण आणि डॉ. सुभाष जाधव यांना सहसंपादक म्हणून नियुक्त करण्यात आले. याच सभेत संपादक मंडळही नेमण्यात आले.
सभेचे प्रास्ताविक संघटनेचे राष्ट्रीय महासचिव नामा बंजारा यांनी केले. राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. रमेश राठोड यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सरदार राठोड यांनी आभार मानले.