Whitener addiction in child: लहान मुलांना लागले जीवघेण्या व्हाईटनरचे व्यसन!

पालकांचे दुर्लक्ष ठरतेय धोकादायक; शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढती चिंता...
Whitener addiction
Published on
Updated on

अजय ढवळे

वाशीम : शालेय वयातील लहान मुलांच्या हातात सहज उपलब्ध होणाऱ्या व्हाईटनरचा वाढता वापर आता चिंतेचा विषय ठरत आहे. सुरुवातीला खोडकरपणातून किंवा मित्रांच्या अनुकरणातून व्हाईटनरचा वापर करणारी काही मुले हळूहळू त्याच्या वासाकडे आकर्षित होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ही बाब दुर्लक्षित केल्यास मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून, पालकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे.

Whitener addiction
Whitener Addiction: उमरगा येथे अल्पवयीन मुलांना ‘व्हाईटनर’चा विळखा; रुमालातून नशा

व्हाईटनरमध्ये असलेल्या रासायनिक घटकांच्या वाफा शरीरासाठी घातक ठरू शकतात. त्याचा गैरवापर केल्यास चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळ, श्वसनास त्रास यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे केवळ 'मुलांचा खेळ' म्हणून या प्रकाराकडे पाहणे धोकादायक ठरू शकते. विशेष म्हणजे, अनेक वेळा मुलांच्या दप्तरात किंवा घरात व्हाईटनर सहज उपलब्ध असतो. पालकांकडून मुलांच्या दैनंदिन हालचालींकडे पुरेसे लक्ष न दिल्याने अशा वस्तूंचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते.

Whitener addiction
Teeth Whitening Tips | दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

शाळांमध्येही विद्यार्थ्यांना व्हाईटनरच्या धोक्यांबाबत योग्य मार्गदर्शन आणि जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. पालकांनी काय काळजी घ्यावी? मुलांच्या वर्तनात अचानक बदल दिसत असल्यास त्याकडे गांभीर्याने पाहावे. व्हाईटनर किंवा अशा रसायनांचा मुलांकडून गैरवापर होत असल्याचा संशय आल्यास त्यांना ओरडण्याऐवजी शांतपणे संवाद साधावा. रसायने आणि त्यासंबंधीच्या वस्तू मुलांच्या सहज आवाक्याबाहेर ठेवाव्यात. मुलांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पालक, शिक्षक आणि प्रशासनाने एकत्रितपणे जनजागृती करणे गरजेचे आहे. 'दुर्लक्ष नको, वेळीच लक्ष द्या' हाच या वाढत्या समस्येवर प्रभावी उपाय ठरू शकतो

Whitener addiction
Underarm Whitening Home Remedies | ब्लॅक अंडरआर्म्सने त्रस्त आहात? मग हे सोपे आणि घरगुती उपाय तुमच्यासाठीच!

... मेडिकल दुकानांत लहान मुलांना व्हाईटनर विक्रीवर निर्बंधाची मागणी

लहान मुलांकडून व्हाईटनरचा गैरवापर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मेडिकल व स्टेशनरी दुकानदारांनी अल्पवयीन मुलांना व्हाईटनर थेट विक्री करू नये, यासाठी योग्य निर्बंध व जनजागृतीची गरज आहे. व्हाईटनर हा रासायनिक पदार्थ असल्याने त्याचा गैरवापर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. मुलांच्या हातात सहजपणे व्हाईटनर उपलब्ध होऊ नये, यासाठी संबंधित प्रशासनाने विक्रेत्यांना आवश्यक सूचना द्याव्यात. विशेषतः अल्पवयीन मुलांकडून मोठ्या प्रमाणात किंवा संशयास्पद पद्धतीने व्हाईटनरची मागणी होत असल्यास विक्रेत्यांनी पालकांशी संपर्क साधावा, अशी मागणीही पुढे येत आहे. मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी पालक, शिक्षक, विक्रेते आणि प्रशासनाने एकत्रितपणे पुढाकार घेणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news